महाराष्ट्र बातम्या

शेळ्या सांभाळणारा सतीश बनला 'पीएसआय'

शिवकुमार निर्मळे

अंबाजोगाई : डोंगराळ भागात शेळ्या सांभाळणाऱ्या सतीश शिंदे याने जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर फौजदार पदाला गवसणी घातली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गाणाऱ्या युवकांना त्याने एकप्रकारे धडाच दिला आहे.

तालुक्यातील मांडवा पठाण येथील सतीश शिंदे याची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. आई - वडिल कोरडवाहू शेती व शेतमजुरी करतात. ग्रामीण भागात त्याने शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात त्याने कला शाखेतून पदवी मिळविली. महाविद्यालयातील प्राध्यापक व मित्रांच्या प्रेरणेने त्याने पोलिस भरती व सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षणही घेतले.

सैनिक भरती प्रक्रियेत दोन किलो वजन कमी भरल्यामुळे त्याला नाकारण्यात आले. त्याने असे अपयश अनेकवेळा पचविले. परंतु जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. आईच्या आजारपणात त्याने सुश्रूषा केली. काही काळ त्याने गावाकडे डोंगराळ भागात शेळ्या सांभाळव्याचेही काम केले व कुटुंबाला हातभार लावला. त्याचे चुलते पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन त्याला मिळत होते. त्याने राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश संपादन केले.

कोणतीही खास शिकवणी न लावता त्याने हे यश मिळविले हे विशेष. त्याच्या यशाने शेतकरी आई - वडिलांच्या आनंदाला मात्र पारावर उरला नाही. 

पोलिस उपनिरीक्षक पदासाठी लेखी परीक्षेबरोबरच शारीरिक क्षमता चाचणीलाही महत्व असते. आपण औरंगाबाद येथील विद्यापीठ परिसरातील नागसेनवन मैदानावर धावण्यावाचा सराव केला. गोळाफेक आणि पुलअप्सचाही दररोज सराव केला. नियमित व्यायामाचाही फायदा झाला. नोकरीत रुजू झाल्यानंतर आपण युवकांना स्पर्धा परीक्षेविषयी मोफत मार्गदर्शन करणार आहोत. 

- सतीश शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

Alandi News : विनर्स अकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई; इमारत सील

SCROLL FOR NEXT