Satyajeet Tambe  esakal
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंची चौकशी व्हावी; कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची मागणी

नाशिक पदवीधर निवडणुकीमुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक पदवीधर निवडणुकीमुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि कॉंग्रेस पक्ष यांच्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अपक्ष म्हणून निवडुण आल्यानंतर तांबे यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. मात्र, पक्षाने त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

काँग्रेसकडून तांबे यांच्या आरोपांचे खंडन करण्यात आले असेल, तरी पक्षातील ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे विधान करत पक्षात सर्व आलबेल नसल्याचेच सूतोवाच केले.

तांबे यांच्या आरोपावरील प्रतिक्रियेसाठी पटोले उपलब्ध झाले नाहीत, मात्र पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तातडीने तांबे यांच्या आरोपांचा इन्कार केला आहे. तांबे यांना योग्य एबी अर्ज दिले होते. त्याच्या नक्कल प्रती आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र याबाबत गंभीर भाष्य केले आहे. तांबे यांच्या बाबतीत झालेला प्रकार गंभीर असून त्याची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत पक्षाच्या वतीने रविवारी (ता.५) खुलासा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले सत्यजीत तांबे?

मी सुरुवातीपासून पक्षाकडे पद किंवा काही तरी जबाबदारी मागितली. मात्र मला पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांनी सांगितलं की तुम्ही वडिलांच्या जागी प्रयत्न करा. त्यानंतर कार्यकर्त्यांचा रेटा पाहून वडिलांनीच माघार घ्यायचं ठरवलं. त्यानुसार मी अर्ज सादर भरण्याचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडून दोन एबी फॉर्म चुकीचे पाठविण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजीत तांबे यांनी केला. 

तसेच, निवडणुकीत आपल्याला सर्वच राजकीय पक्षांनी मदत केल्याचं ते म्हणाले. मात्र मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याच षडयंत्र रचल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र त्यांचा रोख कुणाकडे आहे, हे स्पष्ट केलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT