Satyajeet Tambe, Balasaheb Thorat and Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe : भाजपपासून अंतर, थोरातांचही मौन; सत्यजीत तांबेंचं भवितव्य आता...

संजय मिस्कीन

मुंबई : काँग्रेसचे परंपरागत घराणे म्हणून ओळख असलेल्या थोरात - तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदारसंघात नोंदणी केलेल्या दोन लाख मतदारांवर भरवसा असल्याचे चित्र आहे. राज्यात राजकीय समीकरणाचे कडबोळे झालेले असताना कोणताही धोका नको म्हणून सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. (Satyajeet Tambe news in Marathi)

भाजपच्या पाठिंब्यासाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असले तरी अद्याप याबाबत भाजप अथवा तांबे यांच्याकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. दरम्यान, सुमारे दोन लाख ७० हजार इतके मतदार असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे यांनी दोन लाखांच्या दरम्यान नोंदणी केली आहे.

डॉ. सुधीर तांबे या अगोदर काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीत सलग दोन वेळा विजयी झाले होते. यावेळी विविध संघटना, महाविद्यालये, शिक्षक संस्था आणि विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे यावेळी देखील हे मतदार पाठिशी राहतील, असे सत्यजित तांबे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना स्पष्ट केले.

सत्यजित तांबे यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण प्रदेशस्तरावरील प्रमुख नेत्यांनी डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी द्यावी असा आग्रह पक्षश्रेष्ठीकडे केला. त्यानुसार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्यांनी उमेदवारी दाखल न करता सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. या पक्षशिस्तभंगामुळे तांबे पितापुत्रावर निलंबनाची कारवाई झाली आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अद्यापही मौन बाळगले असून त्यांच्या भूमिकेवर तांबे यांचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा आहे.

नगरमधील समीकरणे बदलणार?

बाळासाहेब थोरात हे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक मानले जातात. तर, शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील देखील विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक मानले जातात. कपिल पाटील यांनी जाहीर सभा घेत सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी फारकत घेतल्याचे स्पष्ट आहे. तांबे यांची अपक्ष उमेदवारी, बाळासाहेब थोरात यांचे मौन आणि कपिल पाटील यांचा पाठिंबा याबाबत नगर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येत असल्याचे दिसत आहे. सत्यजित तांबे यांनी भाजपला पाठिंबा मागितला तर राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी नगर जिल्ह्यातील विखे आणि थोरात-तांबे या घराण्यांचा भाजपला सर्वाधिक फायदा होणार होई शकतो. तूर्तास भाजप अद्याप ‘पाहा आणि थांबा’च्या भूमिकेत आहे.

हेही वाचा जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT