Satyajeet Tambe esakal
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe : विजयाचा आनंद पण विजयोत्सव साजरा करणार नाही; कार्यकर्त्यासाठी तांबे भावूक

सकाळ डिजिटल टीम

नाशिकः नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरु आहे. सत्यजीत तांबे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. परंतु मानस पगार या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या निधानाने आनंदावर दुःखाचं सावट पडलं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल काहीच वेळात हाती येईल. सत्यजीत तांबे यांचा विजय निश्चित मानला जातोय. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक येथे जात असताना एक अपघात झाला. त्यामध्ये सत्यजीत तांबे यांचे कार्यकर्ते मानस पगार यांचा मृत्यू झाला नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आज रात्री सत्यजीत तांबे यांनी मानस पगार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी माध्यमांशी बोलतांना सत्यजीत तांबे म्हणाले की, मानस पगार विचारांशी निष्ठावान असलेला कार्यकर्ता होता. खंबीरपणे तो माझी बाजू मांडत होता. अनेक वर्षे आम्ही सोबत काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या जाण्याचं दुःख आहे.

'आज विजयाचा आनंद असला तरी माणूस जाण्याचं दुःख आहे. त्यामुळे आम्ही विजयोत्सव साजरा करणार नाही' अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी माडली आहे.

दरम्यान, तिसऱ्या फेरीअखेर सत्यजीत तांबे २२ हजारांपेक्षा जास्त मतांच्या आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT