Covaxin vaccine  sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोव्हॅक्सिनचा तुटवडा

तेरा दिवस पुरेल इतकाच लशीचा साठा उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लशीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे पुढील १३ दिवस पुरेल इतकाच लशीचा साठा शिल्लक राहिला आहे.

देशात गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाले. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लस हा एकमेव प्रभावी मार्ग आहे. राज्यात ९१ टक्के नागरिकांनी पहिली लस घेतली तर, अवघ्या ६७ टक्के जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहे. या पार्श्वभूमिवर कोव्हॅक्सिन लशीचा तुटवडा राज्यात निर्माण झाला आहे.

राज्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लशीचा नियमित पुरवठा होत आहे. त्यामुळे कोविशिल्ड लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, भारत बायोटेकच्या कोविशिल्डचे फक्त १३ लाख डोस राज्यात शिल्लक आहेत. राज्यात दररोज कोविशिल्डचे सुमारे ८० हजार ते एक लाख डोस नागरिक घेतात. त्यामुळे जेमतेम पुढील १३ दिवस पुरेल इतकाच साठा राज्यात शिल्लक आहे.

राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले, ‘‘राज्यात कोव्हॅक्सिन लशीचे डोसचा पुरवठा झालेला नाही. ही लस मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.”

लस - लशीचे डोस

  • कोव्हिशिल्ड - १२ कोटी ६५ लाख ५६ हजार ४५९

  • कोव्हॅक्सिन - दोन कोटी १४ लाख २८ हजार ६००

  • स्पुटनिक - दोन लाख ६२ हजार १४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

Shirur Karegaon shooting: शिरूर तालुक्यातील कारेगावमध्ये पाण्याच्या प्लॅण्टवर कामगाराचा डोक्यात गोळी झाडून खून

SCROLL FOR NEXT