Dhananjay Munde 
महाराष्ट्र बातम्या

धनंजय मुंडे यांनी दिले 'हे' आश्वासन

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - समाजकल्याण विभागाच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे प्रलंबित पैसे येत्या 31 मार्चपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होतील, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधान परिषदेत दिले.

मात्र केंद्र सरकारने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मदत करण्याची आवश्‍यकता असून दिवसाला 50 हजार विद्यार्थ्यांना या महापोर्टलच्या यंत्रणेसोबत जोडून घेता येईल, असेही स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले. 

या संदर्भात भाजपचे गिरीश व्यास यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. आतापर्यंत 80 ते 90 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे दिले गेले आहेत. काही विद्यार्थ्यांचे पैसे तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित आहेत, असे मुंडे यांनी मान्य केले. मात्र, पात्र विद्यार्थ्यांना 31 मार्चपर्यंत शिष्यवृत्तीचे पैसे मिळतील अशी ग्वाही त्यांनी विधान परिषदेत दिली. 

महाडीबीटी पोर्टलवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिप प्रतिपूर्ती योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. एका दिवसात अनेक विद्यार्थ्यांना या यंत्रणेसोबत जोडून घेण्यात अडचणी येतात, असे मुंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

SCROLL FOR NEXT