खासगी, स्कूल बस सकाळ
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! डिझेल दरवाढीमुळे स्कूल बसची प्रतिकिमी १०० रुपये भाडेवाढ; पालकांच्या खिशाला झळ; डिझेल आणखी १७ रुपयांनी वाढू शकते, वाचा...

सध्या सोलापूर ग्रामीणमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर ९५.०९ रुपये तर सोलापूर शहरात डिझेल ९५.४२ रुपये प्रतिलिटर आहे. सध्या डिझेल चार रुपयांनी वाढले, तरीही मागणीप्रमाणे पुरवठा नाही. डिझेल-पेट्रोलचे दर आगामी काळात आणखी वाढू शकतात. या पार्श्वभूमीवर खासगी शाळांनी स्कूल बसच्या भाडेवाढीचे मेसेज पालकांना पाठविले आहेत. दुसरीकडे, खासगी स्कूल बस संघटनेनेही प्रति किलोमीटर १०० रुपये भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सध्या सोलापूर ग्रामीणमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर ९५.०९ रुपये तर सोलापूर शहरात डिझेल ९५.४२ रुपये प्रतिलिटर आहे. सध्या डिझेल चार रुपयांनी वाढले, तरीही मागणीप्रमाणे पुरवठा नाही. डिझेल-पेट्रोलचे दर आगामी काळात आणखी वाढू शकतात. या पार्श्वभूमीवर खासगी शाळांनी स्कूल बसच्या भाडेवाढीचे मेसेज पालकांना पाठविले आहेत. दुसरीकडे, खासगी स्कूल बस संघटनेनेही प्रति किलोमीटर १०० रुपये भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा पालकांना स्कूल बस भाड्यापोटी वर्षाचे १८ हजार ते २५ हजार रुपये (गतवर्षीपेक्षा दीड ते तीन हजार रुपये जादा) मोजावे लागणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळांमधील १३ ते १५ हजार विद्यार्थ्यांची वाहतूक परवानाधारक स्कूल बसमधून होते. याशिवाय खासगी प्रवासी वाहने, ऑटोरिक्षातूनही हजारो विद्यार्थी नियमित शाळेत ये-जा करतात. सोलापूर शहर-जिल्ह्यात एक हजार २६७ स्कूल बस असल्याची नोंद सोलापूर व अकलूज ‘आरटीओ’कडे आहे. १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. डिझेल दरवाढीमुळे शाळांच्या स्कूल बसमधून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आधीच भाडे कळविण्यात आले आहे. त्या शाळांनी सर्व पालकांना मेसेज पाठवून अगाऊ सूचना केली आहे. शाळा व्यवस्थापन समिती सदैव तुमच्यासोबत असल्याचेही त्या मेसेजमध्ये नमूद आहे. दुसरीकडे, खासगी स्कूल बस संघटनेने देखील भाडेवाढीचा निर्णय घेतला असून, पुढील आठवड्यात स्कूल बसचालकांची बैठक होणार आहे.

डिझेल वाढले की पुन्हा भाडेवाढ!

जागतिक सद्य:स्थिती पाहता, पुढील काही दिवसांंत डिझेल-पेट्रोलचे दर १५ ते १७ रुपयांनी वाढू शकतात, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. पण, ही दरवाढ एकदम नाही तर टप्प्या-टप्प्याने होईल, असेही सांगण्यात आले. त्या दरवाढीनुसार पुढे स्कूल बसचे भाडे देखील वाढणार आहे.

सध्याचे दरमहा स्कूल बसचे भाडे

  • पहिला टप्पा (एक ते दीड किमी) : १५०० रुपये

  • दुसरा टप्पा (अडीच ते तीन किमी) : २००० रुपये

  • पुढील टप्पे : प्रतिकिमी १०० रुपये

  • ------------------------------------

स्कूल बसची संभाव्य भाडेवाढ (दरमहा)

  • पहिला टप्पा (एक ते दीड किमी) : १६५० रुपये

  • दुसरा टप्पा (अडीच ते तीन किमी) : २३०० रुपये

  • पुढील टप्पे : प्रतिकिमी १०० रुपये

सोलापूर जिल्ह्यातील एकूण स्कूल बस

  • सोलापूर आरटीओ

  • ९६५

  • अकलूज आरटीओ

  • ३०२

  • परवानाधारक स्कूल बस

  • १,२६७

...म्हणून स्कूल बसच्या भाड्यात प्रतिकिमी १०० रुपये वाढ

स्कूल बसची वयोमर्यादा १५ वर्षांची आहे, पण कोरोनात दोन वर्षे अशीच गेली. आता डिझेलचे दर वाढल्याने स्कूल बसचे भाडे देखील प्रतिकिमी किमान १०० रुपये वाढणार आहे. मात्र, सर्व स्कूल बस चालकांना मुबलक प्रमाणात इंधन मिळेल की नाही, याबद्दल खात्री नाही. त्यामुळे ५० हजार रुपये खर्च करून गाड्यांची पासिंग (विमा, ग्रीन टॅक्स, व्यावसायिक कर, रोड टॅक्स व पासिंग फी) करावी की नाही, असा आमच्या सर्वांसमोर प्रश्न आहे.

- संतोष जाधव, शिवप्रकाश विद्यार्थी वाहतूक संघटना, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT