school Bus meeting sakal media
महाराष्ट्र बातम्या

"कोविड काळातील भरपाई दिल्याशिवाय स्कुल बसेस धावणार नाहीत"

ऑल महाराष्ट्र स्कुल बस ओनर्स असोसीएशनच्या बैठकीतील सूर

प्रशांत कांबळे

मुंबई : कोरोनाच्या (corona) पार्श्वभुमीवर राज्यभरातील 40 हजार स्कुल बसेस (school Buses) पूर्णवेळ बंद होत्या. शिवाय बसेसवरील कर्मचारी (employee) बरोजगार (unemployment) झाल्याने स्कुल बसेस व्यवसायावर (bus business) मोठा परिणाम झाला. स्कुल बसेसचे आयुर्मान सुद्धा दोन वर्षाने घटले असून, याची भरपाई राज्य सरकारकडून (mva Government) मिळेपर्यंत राज्यभरात एकही स्कुल बस धावणार नाही. असा निर्णय बुधवारी नवी मुंबईत पार पडलेल्या ओनर्स असोसिएशनच्या (owners association) बैठकीत निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत राज्यभरातील स्कुल बस ओनर्स, शिक्षण संस्थांच्या संचालकांची उपस्थिती होती. दरम्यान चार मुख्य निर्णय यावेळी घेण्यात आले. यामध्ये मुंबई उपनगरात स्कुल बसेसला 8 वर्षाचे आयुर्मान आहे. तर मुंबई उपनगर व्यतिरिक्त 15 वर्षाचे आहे. त्यामुळे मुंबई उपनगरासह इतर जिल्ह्यातील सर्व स्कुल बसेसला आता दोन वर्षाचे आयुर्मान वाढवून देण्यात यावे, डिझेल दरात सवलत, कागदपत्रांना डिसेंबर पर्यंत मुदतवाढ आणि बॅच असलेल्या स्कुल बस चालकांना बेस्टने कामावर घेतल्याने प्रशिक्षित चालकांना नियुक्त करण्यासाठी सुद्धा वेळ देण्यात यावा अशी मागणी स्कुल बस ओनर्स असोसीएशन केली आहे.

बैठकीनंतर या मागण्यासंदर्भातील राज्य सरकारला निवेदन देण्यात येणार असून, जो पर्यंत राज्य सरकार स्कुल बस ओनर्सला न्याय देणार नाही. तोपर्यंत एकही बस धावणार नसल्याची ठाम भूमिका घेण्यात आल्याचे स्कुल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT