राज्यातील शाळांची दिवाळी सुट्टी बदलली sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील शाळांची दिवाळी सुट्टी बदलली ; अचानक बदलाने प्रशासन गोंधळात

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील शाळांच्या सुट्ट्यांमध्ये राज्य शासनाने बदल केला आहे. आता या शाळांना (Diwali Holiday)दिवाळीची सुट्टी 28 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत राहणार आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या सुट्टीनुसार अनेक शाळांनी परीक्षेचे वेळापत्रक तयार केले होते. मात्र आता बदललेल्या तारखांमुळे काही भागातील शाळांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

यापूर्वी राज्यातील शाळांना 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी असेल असा आदेश शिक्षण संचालक पुणे यांनी 20 एप्रिल रोजी काढला होता. त्यानुसार अनेक शाळांनी आपले प्रथम सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक तयार केले होते. परंतु या सुट्ट्यांमध्ये आज अचानक बदल करण्यात आला व ही सुट्टी 28 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीसाठी ठेवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये आठवी ते दहावीच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षा 30 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार होत्या. मात्र आज अचानक उद्या पासून सुट्टी देण्याचा आदेश आल्यामुळे अशा शाळांच्या मध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींची तीन तासांनंतर सुटका; बाहेर आल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया...

NEET Paper Leak Protest: नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात युवक काँग्रेसचा मुसळधार पावसात मोहोळ यांच्या कार्यालयावर अचानक मोर्चा

Supreme Court: 'अपार आयडी'ला सुप्रीम कोर्टाचा रेड सिग्नल! 26 कोटी विद्यार्थ्यांचा प्रश्न; कोर्टाचा मोठा निर्णय

Pune Fraud News : महापालिकेत नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; देवस्थानच्या विश्वस्तासह तिघांवर गुन्हा दाखल

FMD Viral Diseases : राज्यात लाळ्याखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम; १३ ऑगस्टपासून सुरुवात

SCROLL FOR NEXT