schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी; शाळांना व ‘त्या’ शिक्षकांना ३० एप्रिलपूर्वी २० टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा

सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यातील ५७७ शाळा-तुकड्या आणि ३,१३० शिक्षकांना ३१ मार्चपूर्वी वाढीव टप्पा मिळू शकला नाही. प्रस्तावातील त्रुटी व शिक्षकांच्या मान्यतेची कागदपत्रे नसल्याने ते वंचित राहिले. पण, त्यांना ३० एप्रिलपूर्वी अनुदानाचे आदेश दिले जाणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : पुणे विभागातील सोलापूर, पुणे, नगर या तीन जिल्ह्यातील ५७७ शाळा-तुकड्या आणि तीन हजार १३० शिक्षकांना ३१ मार्चपूर्वी वाढीव टप्पा मिळू शकला नाही. प्रस्तावातील त्रुटी आणि शिक्षकांच्या मान्यतेची कागदपत्रे न मिळाल्याने ते वाढीव अनुदानापासून वंचित राहिले. पण, आता त्यांना ३० एप्रिलपूर्वी मुदतवाढ दिली असून त्रुटींची पूर्तता केलेल्यांना २० टक्के वाढीव अनुदानाचे आदेश दिले जाणार आहेत.

सोलापूर, पुणे, नगर या तीन जिल्ह्यातील ६१२ शाळा-तुकड्या आणि तीन हजार ६८० शाळांना यापूर्वीच ४०-६० टक्के अनुदान मिळाले आहे. त्या शाळा-तुकड्या शासन निर्णयानुसार वाढीव २० टक्क्यांच्या अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांची संचमान्यता व कर्मचारी संख्या आणि त्यातील शालार्थ झालेल्यांची संख्या, याचा विचार करून अनुदानाचा वाढीव टप्पा वितरित केला जाणार आहे.

तर तिन्ही जिल्ह्यातील ३९७ शाळा-तुकड्या व एक हजार ४२२ शिक्षकांना पहिल्यांदाच २० टक्के अनुदान मिळणार आहे. पण, काही त्रुटींमुळे त्यातील तब्बल ३६० शाळा-तुकड्या व एक हजार ३३५ शिक्षकांना वाढीव अनुदान मिळू शकले नाही. काही शिक्षकांना यापूर्वी मिळालेल्या वैयक्तिक मान्यतेची कागदपत्रे सापडली नसल्याने त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. पण, आता त्याची दखल शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी घेतली आहे. त्यातून मध्यम मार्ग काढला जाणार असून २०-४० टक्के अनुदान घेणाऱ्या शिक्षकांची मान्यता बोगस, कशी या नैसर्गिक न्याय तत्त्वाचा देखील आता विचार केला जाणार आहे.

राज्यातील ‘विनाअनुदानित’ची स्थिती

  • वाढीव टप्प्यातील शाळा

  • ३,४२७

  • अनुदान वाढणाऱ्या तुकड्या

  • १५,५७१

  • पगार वाढणारे शिक्षक

  • ६३,१८०

  • दरवर्षी सरकारकडून अनुदान

  • ११६०.८८ कोटी

शासनाच्या निकषांनुसार मिळेल वाढीव अनुदान

शासनाच्या मार्गदर्शनानुसार अनुदानाचा वाढीव २० टक्क्यांचा टप्पा न मिळालेल्या शाळा, तुकड्या व शिक्षकांच्या प्रस्तावांची फेरपडताळणी होईल. त्रुटींच्या पूर्ततेनंतर त्यांना ३० एप्रिलपूर्वी अनुदान मंजुरीचे आदेश दिले जातील.

- जावेद शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

‘बोगस’ असलेल्यांना अनुदान नाहीच

विद्यार्थी संख्या कमी असतानाही दुसरीकडून ॲडजेस्टमेंट करून विद्यार्थी वाढल्याचे दाखवून काहींनी तुकडी वाढीची मागणी केली आहे. तीन-चार वर्षांपूर्वी ४० व ६० टक्के अनुदान मिळालेल्या काही शाळा-तुकड्यांची देखील वस्तुस्थिती सध्या वेगळीच आहे. त्यामुळे त्यासंबंधीची पडताळणी काटेकोरपणे केली जाणार आहे. जेणेकरून भविष्यात आपल्या अडचणीत वाढ होणार नाही, याची खबरदारी शिक्षणाधिकारी घेतील, हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Army Success Story: कष्टाच्या जाेरावर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी अभिषेक बिडकर; १३ लाख विद्यार्थ्यांमधून यशाला गवसणी, आई-वडिलांच्या डाेळ्यात पाणी!

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Baramati News: कृषी फीडरवरील वीजपुरवठा सलग पाच दिवस खंडित; ग्रामीण भागात संताप

SCROLL FOR NEXT