schools sakal
महाराष्ट्र बातम्या

शाळांना १५ जूनपर्यंत सुटी! शिक्षकांची जुलैपर्यंत टळली ‘अतिरिक्त’ची भीती; 'आधार'साठी मुदतवाढ

संकेतस्थळाच्या सर्व्हरला नेटवर्कचे अडथळे, स्लो मोडमुळे अनेकांना वेळेत काम करता आले नाही. आता शाळांना सुटी लागली आहे. विद्यार्थी देखील परगावी आहेत. १५-२० दिवसांची मुदतवाढ देऊनही काम होणे अशक्य आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावरच उर्वरित काम करावे लागणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील शाळांनी अद्याप साडेतीन लाख विद्यार्थ्यांची आधार माहिती स्टुडंट्स (विद्यार्थी प्रणाली) पोर्टलवर नोंदवलेली नाही. त्यामुळे ते विद्यार्थी बोगस असल्याचे गृहीत धरून संच मान्यतेत जवळपास १३ हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३० एप्रिलची मुदत संपल्यानंतर अनेकांची चिंता वाढली आहे, पण त्या कामासाठी आता अंदाजे ३० जूनपर्यंत मुदतवाढ राहील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार असणे बंधनकारक आहे. नाव, लिंग, जात, अशा चुकांची दुरुस्ती देखील करणे आवश्यक असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. आता आगामी संच मान्यतेसाठी आधार क्रमांक व अचूक माहिती असलेलेच विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. तत्पूर्वी, १५ एप्रिलपर्यंत मुदत होती. मात्र, संकेतस्थळाच्या सर्व्हरला नेटवर्कचे अडथळे आणि स्लो मोडमुळे अनेकांना वेळेत काम करता आले नाही. त्यातच आता शाळांना सुटी लागली आहे. सुट्ट्यांमुळे विद्यार्थी देखील परगावी आहेत. या पार्श्वभूमीवर १५-२० दिवसांची मुदतवाढ देऊनही काम होणे अशक्य आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावरच उर्वरित काम करावे लागणार आहे.

‘अतिरिक्त’चा निर्णय सहजपणे नाहीच

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ३५ हजारांवर तर खासगी अनुदानित शाळांमध्ये जवळपास २७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदांची भरती काही दिवसांतच सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्येक जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावरच भरती प्रक्रिया राबवायची आहे. परंतु, आधारकार्ड नाही किंवा आधारवरील माहितीत त्रुटी आहेत म्हणून सध्या कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याचा निर्णय सहजपणे व तत्काळ घेणे डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यासाठी मुदतवाढ मिळेल, असेही सूत्रांनी सांगितले.

संचमान्येनंतरच शिक्षक भरती

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता झाल्यावर त्यातून रिक्त व अतिरिक्त शिक्षकांची संख्या समोर येणार आहे. त्यानंतर नवीन शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु होईल. पण, सध्या २०२१-२२ या वर्षाचीच संच मान्यता सुरु आहे. त्यामुळे २०२२-२३ या वर्षातील संच मान्यतेसाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : धावपट्टीला स्पर्श करताच विमानाने घेतले पुन्हा हवेत उड्डाण

Kolhapur Crime : एक कोटी दे, मग बांधकाम कर; बिल्डरचं अपहरण, संशयिताने लढवलेली महापालिकेची निवडणूक

SCROLL FOR NEXT