minister varsha gaikwad sakal media
महाराष्ट्र बातम्या

सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

ओमकार वाबळे

राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे शालेय शिक्षण विभागानं प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यात याव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पण स्थानिक प्रशासनानं याबाबत निर्णय घेण्यात यावा असंही या प्रस्तावात म्हटलं आहे. (Schools Reopen in Maharashtra)

त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली. येत्या सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या 24 जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत.(schools will reopen from monday in Maharashtra)

गायकवाड म्हणाल्या, "पालक, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजमाध्याद्वारे अनेकांकडून शाळा सुरू करण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी आमच्याकडे येत होती. त्यामुळे या काळात आम्ही अनेक स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. (Varsha Gaikwad on Schools Reopening)

ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल अशा स्थानिक पातळीवरील सीईओ, कलेक्टर किंवा आयुक्तांना शाळा सुरू करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिला होता. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

वाचा नवी नियमावली

स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार

शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत

शाळेत जाऊन लसीकरण करता येईल का, याची पडताळणी

24 तारीख पासून 1 ली ते 12 वी पर्यतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय

स्थानिक प्रशासनाने निर्णय घेताना तिथल्या परिस्थितीचा अंदाज घ्या

एक निर्णय घेतो म्हणून दुसर्याने घेतलाच पाहिजे असे नाही

आता कोरोनाची लाट ओसरत असल्याची आकडेवारी मागील 4 दिवसांपासून समोर येत असल्याने पुन्हा शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. याआधी शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू व्हाव्या असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं होतं.

अखेर 20 दिवसांपासून बंद असलेले वर्ग पुन्हा भरवण्याला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीआधी ऑफलाईन वर्ग सुरू होणार आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुकूलता दर्शवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT