NEET UG 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

NEET Exam: नीट परीक्षेत लातूरमध्ये दहा विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिले, इतर परीक्षांचाही होणार तपास; CBIचे अधिकारी ठाण मांडून

८ जुलै रोजी एकूण २६ याचिकांवर सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. मनोज मिश्रा आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’, ‘आयुष’ तसेच इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे दिले जातात.

संतोष कानडे

मुंबईः बिहारच्या पाटण्यात उघड झालेल्या नीट परीक्षेच्या घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडत आहेत. मराठवाड्याच्या लातूरला विद्येची नगरी म्हटलं जातं, तिथं सीबीआयची टीम तपास करत आहे. तब्बल १० विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याचं प्रकरण पुढे आलेलं आहे.

नीट परीक्षेत 10 विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याची माहिती CBI चौकशीत समोर आली असून सीबीआयचे अधिकारी लातूरात नीट परीक्षेच्या चौकशीसाठी ठाण मांडून आहेत. विशेष म्हणजे नीट बरोबर इतर स्पर्धा परीक्षांचे देखील प्रवेश पत्र अधिकाऱ्यांना तपासामध्ये आढळले आहेत.

नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूरमध्ये चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये दोन आरोपी सध्या सीबीआयच्या अटकेत आहेत तर इतर दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

अटकेत असलेल्या दोन आरोपींच्या मोबाईलमधून आतापर्यंत 10 विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत गुणवाढ करुन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर हे 10 विद्यार्थी कोण आहेत याचा मात्र खुलासा सध्या तरी झालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आणि बिहार राज्यातील संशयास्पद परीक्षा केंद्राचा नेमका संबंध काय? याचा तपास आता सीबीआय (CBI)अधिक वेगाने करत असल्याची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, ८ जुलै रोजी एकूण २६ याचिकांवर सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. मनोज मिश्रा आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’, ‘आयुष’ तसेच इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे दिले जातात.

सध्या अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील तोडकर, उप्पलवार आणि डोंगरे या तिघांचं यामध्ये काय कनेक्शन आहे, याची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: "दारू पाजून कट रचवला"; जरांगे पाटील हत्याकट प्रकरणात नवा ट्विस्ट! अटक आरोपीच्या पत्नीचे धक्कादायक आरोप

Uddhav Thackeray : सरकार तुमच्या तोंडाला पाने पुसतंय, महायुतीला व्होटबंदी करा; उद्धव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आवाहन

Nashik Crime : नाशिक: ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले! 'काठे गल्ली' सिग्नलजवळ ६.५ ग्रॅम एमडीसह चौघे अटकेत

Congress Leader Kolhapur : कोल्हापुरात काँग्रेस नेत्याचा बंगला फोडला, पत्नीवर धारधार शस्त्राने वार; कुरिअर बॉय असल्याचा बहाण्याने रोकड लुटली

चाकणकरांवर टीका, पक्षानं धाडली नोटीस; रूपाली ठोंबरे म्हणाल्या, वेळ खूपच कमी

SCROLL FOR NEXT