vaccination File photo
महाराष्ट्र बातम्या

Fact Check : कोविशिल्डचा एक डोस पुरेसा?

लशीचे दोन डोस घेणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु...

शर्वरी जोशी

वर्षभरापूर्वी देशात शिरकाव करणाऱ्या कोरोना (coronavirus) विषाणूवर अद्यापही कोणतं ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. मात्र, या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस मात्र बाजारात आली आहे. त्यामुळे सध्या आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवत आहे. यामध्येच कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. ही इम्युनिटी पॉवर लसीकरणानंतर वाढते. त्यामुळेच लशीचे दोन डोस (second-dose) घेणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु, लसीचा एक डोस घेणंही पुरेसा असल्याचा दावा एका व्हायरल मेसेजमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच, पीआयबीने या व्हायरल मेसेजमागील सत्यता पडताळल्यानंतर खरी परिस्थिती समोर आणली आहे. (second-dose-of-covid-19-vaccine-more-effective-against-variants)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये Covishield चा एक डोसदेखील पुरेसा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे. यावर पीआयबीने सत्य परिस्थिती सांगितली आहे. त्यानुसार, Covishield असो किंवा कोव्हॅक्सीन असो, लशीचे दोन डोस घेणं अत्यंत गरजेचं असून व्हायरल होत असलेला मेसेज फेक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

"#Covishield चा एक डोस घेण्याची माहिती खोटी आहे. कोविशिल्डच्या लसीकरणामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे लसीचे दोन डोस घेणं गरजेचं आहे. तसंच १२ आठवड्यांनंतर दुसरा डोस घ्यावा", असं पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये सांगण्यात आलं आहे. सोबतच त्यांनी नीती आयोगाचे सदस्य डॉ.वी.के. पॉल यांचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, "भारतात कोविशिल्डचे २ डोस घेणं गरजेचं आहे. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही", असं पॉल यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अनेक जण लसीचा एक डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करतात. लसीचा एक डोस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, असा अनेकांचा समज आहे. परंतु, लशीचे दोन डोस घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि विश्वास ठेवण्यापूर्वी त्या मेसेजमागील सत्यता पडताळू पहा असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकोल्यात कर्जाच्या वसूलीसाठी शेतकऱ्याचं घर सील करताच बच्चू कडू संतापले! थेट हातोडा घेतला अन्...

Gold Silver Price: धनत्रयोदशीआधी सोन्याच्या भावात मोठी घसरण! चांदीही 1,86,273 रुपयांवर; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील ताजे दर किती?

Mumbai Rain: मुंबईत पावसाची रिपरिप, उकाड्यापासून दिलासा! पुढील काही तासांत मेघगर्जनेची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Marathi News Live Updates : वांद्रेतील 'व्हीएन स्फेअर मॉल'मधील रेस्टॉरंटमध्ये आग

Pune News: एकाच दिवशी दोन परीक्षा, विद्यार्थ्यांसमोर पेच; अभियांत्रिकीच्या नियमित, बॅकलॉग परीक्षा एकाच दिवशी

SCROLL FOR NEXT