farmer help 
महाराष्ट्र बातम्या

मोठी ब्रेकिंग ! केंद्राच्या निधीनंतरच मदतीचा दुसरा हप्ता; साडेदहा लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात जुलै ते ऑक्‍टोबर या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दोन हजार 214 कोटी रुपयांची मदत दिली. मात्र, अद्याप राज्यातील सुमारे साडेदहा लाख शेतकऱ्यांना मदत मिळाली नसून त्यासाठी केंद्र सरकारला मदतीचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. केंद्राकडून मदत मिळाल्यानंतर दुसऱ्या हप्त्याचे अडीच हजार कोटी रुपये मिळतील, असे मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.

ठळक बाबी...

  • अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी लागणार पाच हजार कोटी
  • पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिली 2214 कोटींची मदत
  • घराची पडझड व नदीकाठच्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्याने दिली मदतीची रक्‍कम
  • सोलापूर जिल्ह्यातील 90 हून अधिक गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही
  • पुढील मदतीपूर्वी मदत व पुनर्वसन विभागाने मागितला पहिल्या टप्प्यातील वाटपाचा अहवाल
  • दुसऱ्या टप्प्यातील मदतीसाठी राज्य सरकारचे केंद्र सरकारला पत्र; केंद्राच्या मदतीनंतरच मिळणार मदत

परतीच्या पावसाने पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. मुख्यमंत्र्यांनी 'खचू नका धीर, ठाकरे सरकार आहे खंबीर' म्हणत बळीराजाला धीर दिला. राज्य सरकारने दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली. परंतु शेती पिकांच्या नुकसानीसाठी पहिल्या टप्प्यात बावीसशे कोटींचीच मदत मिळाली. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन मदत देण्याचे आश्‍वासन दिल्याचे खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मात्र, केंद्राकडून किती मदत मिळावी, याबाबत अद्याप रक्‍कम निश्‍चित झालेली नाही. किती शेतकरी मदतीपासून वंचित राहिले, त्यांच्यासाठी किती रक्‍कम लागणार आहे, यावरुन पुढील आठवड्यात रक्‍कम अंतिम करुन केंद्र सरकारकडे मदत मागितली जाणार आहे. डिसेंबरअखेर मदतीचा दुसरा हप्ता मिळेल, असा विश्‍वास मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.


दुसऱ्या हप्त्याचा अद्याप निर्णय नाही
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हप्ता वितरित केला आहे. दुसऱ्या हप्त्याचा निर्णय अजून झाला नसून, त्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीच्या रकमेची मागणी केली जाणार आहे.
- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT