solapur city jewellery theft

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात १५ दिवसांत दुसरी मोठी घरफोडी! बंद घरातून चोरट्याने पळविले २० लाखांचे दागिने, रोकड, घरमालक मुलीकडे पुण्याला, मुलगा जळगावला, सून माहेरी अन्‌...

जुळे सोलापूर परिसरातील कल्याण नगर भाग-२ मधील चंद्रकांत शिवबाळा भांजे (वय ६७) हे मुलीकडे पुण्याला गेले होते. त्यांचा मुलगा सोलरची कामे करतो. कामानिमित्त तो जळगावला गेला होता. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने एक लाख २० हजारांची रोकड व सुमारे २५ तोळे दागिने (बिलवर, पाटल्या, गंठण, नेकलेस, अंगठ्या, टॉप्स, जुबे, वेल, लॉकेट) असा अंदाजे २० लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील जुळे सोलापूर परिसरातील कल्याण नगर भाग-२ मधील चंद्रकांत शिवबाळा भांजे (वय ६७) हे मुलीकडे पुण्याला गेले होते. त्यांचा मुलगा सोलरची कामे करतो. कामानिमित्त तो जळगावला गेला होता. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने एक लाख २० हजारांची रोकड व सुमारे २५ तोळे दागिने (बिलवर, पाटल्या, गंठण, नेकलेस, अंगठ्या, टॉप्स, जुबे, वेल, लॉकेट) असा अंदाजे २० लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. विजापूर नाका पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

फिर्यादी चंद्रकांत भांजे हे आर्मीतून सेवानिवृत्त झाले आहेत. शनिवारी चंद्रकांत भांजे व त्यांची पत्नी पुण्याला गेले. मुलगा सोमवारी जळगावला गेला. घरातील एकटी सून एक दिवसासाठी घर बंद करून शहरातीलच माहेरी गेली होती. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास भांजे यांचा मुलगा घरी आला होता. त्यावेळी घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात कोणी नव्हते. कपाट उचकटलेले होते. याची माहिती मुलाने वडिलांना दिली. वडील पुण्यावरून आले आणि त्यांनी विजापूर नाका पोलिसांत धाव घेतली. चोरीला गेलेल्या दागिन्यांत त्यांच्या मुलीचेही दागिने होते. त्यामुळे तिचे किती तोळे दागिने चोरीला गेले, हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यांची मुलगी पुण्यातून आल्यावर ते स्पष्ट होईल, असे विजापूर नाका पोलिसांनी सांगितले.

श्वान पथक जागीच घुटमळले, पोलिसांनी घेतले फिंगरप्रिंट

१५ दिवसांपूर्वी जुळे सोलापुरातील गीता नगर येथील रेवती तमशेट्टी यांच्या घरातून साडेसात लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यानंतर २६ मे रोजी जुळे सोलापूर परिसरातच घरफोडी झाली आहे. घरफोडीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, श्वान पथक, गुन्हे शाखेचे अधिकारी, ‘फिंगरप्रिंट’चे अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. तेथील फिंगरप्रिंट पोलिस घेऊन गेले, पण श्वान जागीच घुटमळले. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी व बुधवारी दिवसभर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले. त्यात काही संशयित आढळले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.

घरात २० लाखांचा ऐवज, पण सीसीटीव्ही नाही

आर्मीतून सेवानिवृत्त झालेल्या चंद्रकांत शिवबाळा भांजे यांच्या घरात चोरी झाली. पण त्यांच्या घरासमोर एकही सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला नाही. परिसरातदेखील कॅमेरे नाहीत. विजापूर नाका पोलिसांनी भांजे यांना, ‘एक-दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे होते की,’ असे विचारले. त्यावेळी, ‘साहेब, यापूर्वी कधीच आमच्या घरी चोरी झाली नाही. पहिल्यांदाच असा प्रकार झालाय,’ असे उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT