Sachin Kurve 
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांचे सचिव आता राज्यपालांचे सचिव; काय गौडबंगाल?

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपालांकडे आले आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव असलेले आयएएस अधिकारी सचिन कुर्वे यांची राज्यपालांचे सचिव म्हणून बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामागे नक्की काय गौडबंगाल याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

सध्या राजकीय वर्तुळात 2003 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी सचिन कुर्वे यांची गव्हर्नर हाऊसमध्ये करण्यात आलेली बदली चर्चेचा विषय आहे. सचिन कुर्वे हे प्रशासकीय कामांमध्ये राज्यपालांना मदत करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे सचिव असलेल्या कुर्वेंची अचानक बदली झाली. 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर कुर्वे हे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे सर्वांत जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांना नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केलेले आहे. त्यानंतर त्यांची मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जुलैमध्ये त्यांना मुख्यमंत्र्याचे सचिव करण्यात आले. आता त्यांची राज्यपाल भवनात बदली झाली आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट असल्याने कुर्वेंकडे आता मोठी जबाबदारी आहे. राज्यपालांना प्रशासकीय कामात मदत करण्याबरोबरच अनेक महत्त्वाच्या कामांतही त्यांचा सहभाग असणार आहे. कुर्वे हे मुळचे उत्तराखंडमधील असून, सध्याचे राज्यपालही उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. राज्यपालांवर शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांनी सत्तास्थापनेसाठी वेळ कमी दिल्याचा आरोप होत आहे. राज्यात भाजप अद्यापही सत्ता स्थापनेचा दावा करत असताना याच्याशी याचा संबंध जोडण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT