Aditya Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या नव्या आक्रमक अंदाजावर खास गाणं लॉन्च

सकाळ डिजिटल टीम

सत्तासंघर्षानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा पक्षबांधणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या याच भूमिकेवर एक गाणं बनविण्यात आलं आहे. अन्यायाविरुद्ध लढणारा शिवसेनेचा युवराज असे शब्द या गाण्यात आहेत. (Senecha Yuvraj Another ShivSena song launch Aditya Thackeray maharashtra politics )

आगामी निवडणूकांसाठी रणनिती आखण्यात आणि राज्यात दौर्‍यांचा धडाका लावत शिंदे-फडणवीस सरकार वर टीकास्त्र डागण्यात आदित्य ठाकरे अग्रेसर दिसत आहेत. त्यांच्या याच नव्या अंदाजावर आता शिवसेनेकडून 'सेनेचा युवराज' हे नवं गाणं लॉन्च करण्यात आलं आहे. या गाण्याला मनिष राजगिरे आणि शमिका भिडे यांचा आवाज आहे. शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक संजय कदम यांनी हे गीत तयार केले आहे.

च शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिंदे गटानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावरील गाणं लाँच केलं. अनाथांचा नाथ... लोकनाथ असे म्हणत शिंदे गटाचेही गाणे लाँच झाले. आता, आदित्य ठाकरे यांच्यावर नवं गाण आले आहे.

शिवसेनेतील बंडाळीनंतर आदित्य ठाकरेंनी मोर्चा हाती घेतल्याचं दिसून आलं. विविध संवाद यात्रांमधून जनतेला आदित्य ठाकरे संबोधित करताना दिसत आहेत. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाचं गुण गाणारं हे गाणं लाँच करण्यात आलं आहे.

'शिवसेनेचा युवराज' असे शीर्षक असलेल्या या गीताचे आज लॉन्चिंग करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते अंधेरी पश्चिमेकडील एका विशेष कार्यक्रमात हे गाणे लाँच झाले. माजी केंद्रीय मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक संजय कदम यांनी हे गीत तयार केले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या एक दिवस अगोदर हे गाणे लॉन्च करण्यात आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंचा चेहरा समोर करत हे प्रचार गीत शिवसैनिकांमध्ये नवा जोश, नवा उत्साह भरु शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

SCROLL FOR NEXT