senior lawyer ujjwal nikam reaction on supreme court verdict shivsena dispute and 16 mla disqualification sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर घोडेबाजार करू नये; उज्ज्वल निकम

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल असणार आहे. याचे दूरगामी परिणाम भविष्यातील राजकारणावर पडणार आहे. या निकालानंतर घोडेबाजार करू नये, असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांना दिला.

शहरात सायंकाळी आयोजित एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाकडे राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे लक्ष लागले आहे. यावर बोलताना ॲड. निकम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कुणाच्याही बाजूने लागू शकतो. मात्र, या १५ आमदारांवर निकाल येईपर्यंत टांगती तलवार नक्कीच असेल, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अनेक दिवस सुनावणी सुरू होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर १४ फेब्रुवारी ते १६ मार्च सलग सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT