Hasan Mushrif statement Amit shah will meet ajit pawar kolhapur politics
Hasan Mushrif statement Amit shah will meet ajit pawar kolhapur politics sakal
महाराष्ट्र

Hasan Mushrif : ईडीची कारवाई हेतूपुरस्सर! हसन मुश्रीफ यांची हायकोर्टात धाव

संतोष कानडे

मुंबईः माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्यावर होत असलेल्या कारवाया हेतूपुरस्सर असून जोपर्यंत फसवणूक प्रकरणात सुनावणी होत नाही तोपर्यंत अटकेची कारवाई करु नये, या मागणीसाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

(Money Laundering Case)

ईडीने हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी 6 मार्चला सुनावणी होणार आहे.

त्यापूर्वी आज हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या प्रकरणामध्ये सुनावणी होईपर्यंत अटकेची कारवाई करु नये या मागणीसाठी त्यांनी कोर्टाचं दार ठोठावलं आहे.

आपल्यावर होत असलेली कारवाई जाणूनबुजून आहे. त्यामुळे याप्रकरणी आरोपपत्र दाखल होऊ नये, सुनावणीपर्यंत कुठलीही कारवाई करु नये अशी विनवणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे.

मुलांवरही कारवाईची टांगती तलवार

हसन मुश्रीफ यांची मुलं नाविद, आबिद आणि साजिद यांच्या अटकपूर्व जामिनाला ईडीकडून विरोध करण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्या मुलांच्या वतीनं ज्येष्ठ वकील आबाद पोंडा, अमित देसाई आणि प्रशांत पाटील बाजू मांडत आहेत. दरम्यान, संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी आणि इतर लोकांना भागभांडवल देतो, असं म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी मुश्रीफांविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 40 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांनी दिलीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT