Devendra Fadnavis
Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: त्यांचे लग्न, मुलगी झाली...खडसेंनी फडणवीसांना करुन दिली 'त्या' भीष्म प्रतिज्ञेची आठवण

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही अशी प्रतिज्ञा फडणवीस यांनी घेतली होती असा खुलासा राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ( separate vidarbha issue Eknath khadse slams devendra fadnavis)

हिवाळी अधिवेशनात काल वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चांगलाच गाजला. एकनाथ खडसे यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लग्नावरुनच टोला लगावला.

काय म्हणाले खडसे?

"देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. ते विर्दभातले आहेत. स्वतंत्र विर्दभासाठी ते आग्रही होते. विर्दभ वेगळा होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा फडणवीस यांनी घेतली होती. मात्र त्यांचे लग्न झाले. मुलगी झाली. मुलगी आता मोठी झाली. त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे," असा शब्दात खडसे यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली.

तसेच, राज्य सरकारने जवळपास तीस हजार कोटीचं कर्ज चार महिन्यांपूर्वी ठाणे आणि मुंबईसाठी घेतलं. मुंबईचा खर्च 45 हजार कोटीचा आहे. फक्त मुंबईच विकासासाठी महत्त्वाचा आहे का? महत्त्वाचा आहे. पण फक्त मुंबई -ठाण्यासाठी 45 हजार कोटी खर्च करता तर विदर्भासाठी किती खर्च करत आहात ते सांगा. अशी विचारणादेखील खडसे यांनी यावेळी केली.

वेगळ्या विदर्भाची पहिली मागणी केव्हा झाली?

विर्दभ वेगळा करावा, अशी मागणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी करण्यात आली. विदर्भ वेगळा करण्याची मागणी ही नागपूर करारानंतर करण्यात आली. परंतु ही मूळ मागणी मध्य प्रदेशमध्ये आणि विदर्भ हा सीपी अँन्ड बेरार राज्य अशी ओळख असलेल्या प्रदेशापासून आहे. त्यावेळी आठ जिल्हा असलेला भाग एका जिल्ह्यात रुपांतरीत झाला.

मात्र, ही मागणी १०० वर्षांपूर्वी झाली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वेगळ्या विदर्भाची मागणी देश स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या काळात झाली. तेव्हापासून ही वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT