seventy three percentage water stock in the state 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात ७३ टक्के साठा

प्रतिनिधी

पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली.

पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये मात्र अद्यापही पुरेशा साठ्याअभावी स्थिती चिंताजनक आहे. सोमवारी मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये १ हजार ५८ टीएमसी (७३ टक्के) पाणीसाठा झाला. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ६५ टक्के पाणी उपलब्ध होते.

विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा मराठवाड्यात सर्वांत कमी ४० टक्के, तर पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात सर्वांत कमी ५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागात पाणीसाठ्याची स्थिती चांगलीच सुधारली असून, तब्बल ८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात ८७ टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात ७८ टक्के आणि कोकण विभागात ९० टक्के पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून  दिसून येते. 

बीड, हिंगोली, उस्मानाबादेत धरणे रिकामीच
जायकवाडी धरणाच्या अचल साठ्यात २६.०५ टीएमसी, तर चल साठ्यामध्ये ७६.६४ टीएमसी (१०० टक्के) असे एकूण १०२.७३ टीएमसी (१०० टक्के) पाणी आहे. येलदरी धरणात ६ टक्के, तर नांदेडच्या निम्न मनार धरणात १०० टक्के पाणीसाठा असला, तरी मराठवाड्यातील उर्वरित धरणांच्या पाणलोटात पावसाने ओढ दिल्याने बीड, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यातील धरणे रिकामीच आहेत. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ८९.१२ टीएमसी म्हणजेच ५६ टक्के उपयुक्त साठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

Maharashtra Board: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

SCROLL FOR NEXT