drought esakal
महाराष्ट्र बातम्या

Drought News: राज्यातील 54 तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई; मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Drought News : राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्याने सर्वदूर टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या भूजल विकास व सर्वेक्षण विभागाने महाराष्ट्रातील ३५३ तालुक्यांच्या पाणी पातळीचे सर्वेक्षण केल्यानंतर ५४ तालुक्यांमध्ये यंदा तीव्र ते मध्यम स्वरूपाची पाणीटंचाई भासणार असल्याचा निष्कर्ष काढला आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे राज्य सरकारने ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले. यात वाढ होण्याची शक्यता आहे. (Severe water shortage in 54 talukas of state maharashtra news)

राज्यातील दुष्काळाची दाहकता निश्चित करताना संबंधित तालुक्याच्या पाणीपातळीचे मोजमाप केले जाते. दहा वर्षांची सरासरी विचारात घेऊन पाण्याच्या पातळीत वाढ किंवा घट नोंदवली जाते. मॉन्सून पूर्व आणि पश्चात अशी दोनवेळा नोंद या विभागाकडून होत असल्याने त्यांच्या सर्वेक्षणाला फार महत्त्व आहे.

यंदा ऑक्टोबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील शिरूर (पुणे) व (खंडाळा) सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यात अतिशय तीव्र स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे दिसून येते. अंबेजोगई (बीड), परांडा (धाराशिव), बारामती व इंदापूर (पुणे), काडेगाव, खानापूर व शिराळा (सांगली) या तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई असल्याची नोंद झाली आहे.

या तालुक्यांच्या पाणीपातळीत यंदा शून्य ते २.४५ पर्यंत घट झाल्याचे दिसून येते. राज्यातील उर्वरित ४५ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाची पाणीटंचाई भासणार असल्याचा अंदाज भूजल विभागाने वर्तवला आहे.

पाणीटंचाई भासणारे तालुके

दौंड, खेड, मुळशी, पुरंदर, वेल्हे, आंबेगाव (पुणे), बार्शी, करमाळा, म्हाडा, म्हाळशिरस, सांगोला, सोलापूर उत्तर (सोलापूर), वाई (सातारा), मीरज, वाळवा (सांगली), लोहरा, धाराशिव, वाशी (धाराशिव), मालेगाव, येवला, चांदवड (नाशिक), शहादे, नंदुरबार (नंदुरबार), रेणापूर (लातूर), हातकणंगले, गडहिंग्लज (कोल्हापूर), परतूर, मन्ठा, जालना, चांदसांगवी, भोकरदन, बदनापूर, अंबड (जालना), चाळीसगाव (जळगाव), साक्री, शिंदखेडे (धुळे), लोणार, चिखली, बुलडाणा (बुलडाणा), वादवानी, माजळेगाव, धारूर (बीड), छत्रपती संभाजीनगर, सोयगाव (छत्रपती संभाजीनगर), तेवसा (अमरावती).

चांदवडऐवजी सिन्नरचा समावेश कसा

भूजल सर्वेक्षणाच्या आधारे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त ४० तालुक्यांची नावे जाहीर केली. यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला व सिन्नरचा समावेश आहे. पण भूजल सर्वेक्षणाच्या यादीत चांदवडचा समावेश असताना दुष्काळग्रस्तांच्या यादीत सिन्नरचे नाव आले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचात निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT