solapur rural police 

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

शाळेत निघालेल्या ९ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार! नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप; सोलापूर जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, फिर्यादी असलेल्या पीडितेच्या आईचे निधन, तरीपण...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या २५ वर्षीय नराधमाला सोलापूर जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक आणि कठोर शिक्षा सुनावली. आरोपी बापू सिद्धप्पा कुसेकर (रा. अक्कलकोट) याला मृत्यू होईपर्यंत तुरुंगवासाची (मरेपर्यंत जन्मठेप) शिक्षा आणि ७१ हजार रुपयांचा दंड देखील सुनावला. जिल्हा न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

तात्या लांडगे

सोलापूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या २५ वर्षीय नराधमाला सोलापूर जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक आणि कठोर शिक्षा सुनावली. आरोपी बापू सिद्धप्पा कुसेकर (रा. अक्कलकोट) याला मृत्यू होईपर्यंत तुरुंगवासाची (मरेपर्यंत जन्मठेप) शिक्षा आणि ७१ हजार रुपयांचा दंड देखील सुनावला. जिल्हा न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

पीडित चिमुरडी अवघ्या ९ वर्षांची होती. २०१४ मध्ये चिमुरडी शाळेत जात असताना आरोपी बापू कुसेकर याने तिला तिच्या आईच्या ताब्यातून बेकायदा जबरदस्तीने पळवून नेले. अक्कलकोट येथील एका दगडाच्या खाणीत, निर्जनस्थळी नेऊन त्याने पीडितेला बेदम मारहाण केली. त्यानंतर ती रडत असताना देखील तिच्यावर पाशवी शारीरिक अत्याचार केला. या गंभीर अत्याचारानंतर पीडिता अत्यंत जखमी अवस्थेत सापडली होती.

या प्रकरणी पीडितेच्या आईने अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र, गुन्हा करून आरोपी साडेचार-पाच वर्षे फरार होता. दरम्यान, गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विलास नाळे व श्री. काकडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यात कोर्टपैरवी म्हणून पोलिस उपनिरीक्षक अविनाश जाधव, अंमलदार अजित सुरवसे, सचिन पुजारी यांनी काम पाहिले.

आरोपी होता ५ वर्षे फरार, पीडितेच्या आईचे निधन, तरीपण...

गुन्हा करून आरोपी २०२१ पर्यंत फरार होता, पण अखेर पोलिसांनी त्याला शोधून काढले. दरम्यान, खटला सुरू होण्यापूर्वीच पीडितेची आई फिर्यादीचे निधन झाले. त्यामुळे फिर्याद देताना समक्ष असलेल्या अधिकाऱ्याच्या साक्षीवरून पीडितेच्या आईनेच फिर्याद दिल्याचे सिद्ध करावे लागले. डॉक्टरांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदविण्यात आली. न्यायालयीन कामकाजावेळी सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. कविता बागल यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यात नेत्रसाक्षीदार, पीडिता व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. तपास अधिकाऱ्यांनीही वस्तुनिष्ठ पुरावे सादर केले होते. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला दोषी मानले. खटला यशस्वी करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, तत्कालीन उपअधीक्षक विलास यामावार यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT