padmashri shabbir mamu esakal
महाराष्ट्र बातम्या

PadmaShri : पाणी देता का पाणी? गो-सेवेसाठी पद्मश्री मिळालेल्या शब्बीर मामूंच्या गायी तहानल्या

संतोष कानडे

मुंबईः निःस्पृह गो-सेवेसाठी ज्या शब्बीर मामूंना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. त्याच शब्बीर मामूंच्या गायी आज पाण्यासाठी भटकत आहेत. 'गोसेवा हीच ईश्वरसेवा' या विचारांवर चालणाऱ्या दोन्ही सरकारांचं मात्र मामूंच्या दुरवस्थेकडे लक्ष नाही.

Shabbir Mamu

बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार येथील शब्बीर मामू हे आजघडीला १७० ते १८० गायी सांभाळतात. ते लहानपणापासून गायी सांभाळण्याचे काम निरपेक्ष भावनेने करतात. विशेष म्हणजे ते गाईचे दूध काढत नाहीत किंवा विकतही नाहीत. त्याचबरोबर गायींची वासरे किंवा गाय विकत नाहीत.

लोक जखमी गाईंना शब्बीर मामूंच्या स्वाधीन करतात. हे त्यांचं कार्य बघून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं. केंद्र सरकारने त्यांना २०१९ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार दिला.

हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

त्याच शब्बीर मामूंच्या गायी आज तहानलेल्या आहेत. गायींना पाणी पाजण्यासाठी पाच किलोमीटरचा प्रवास करुन नगर जिल्ह्यात न्यावं लागतं. मार्च महिन्यातच गावात पाण्याची वाणवा झाल्याने गायींची फरफट होतेय. दिवसातून दोन वेळा गायी पाच किलोमीटर पाण्यासाठी जातात, हे दुर्दैवी आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील रिपोर्ट केला आहे.

या समस्येवर बोलतांना पद्मश्री शब्बीर मामू म्हणाले की, आतापासूनच बोअरला पाणी नाही. पाण्यासाठी पाच किलोमीटर पायपीट करावी लागते. गायींना एका तलावाचा आसरा आहे. चाऱ्याचीही पंचाईत असून डोंगरात जनावरे चारावी लागतात. सरकारकडून फक्त पुरस्कारच मिळाला, परंतु कसलीही मदत मिळाली नाही.

महत्त्वाचं म्हणजे सकाळी आणि दुपारी गायींना पाणी मिळतं. मात्र संध्याकाळी गायी तहानलेल्याच असतात. त्यांच्या पाण्याचा प्रश्न उग्र झाला आहे. गोसेवेमुळे पद्मश्री मिळालेल्या शब्बीर मामूंच्या गायींसाठी राज्य सरकार काही करेल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT