shahaji bapu patil slams Congress leader nana patole Maharashtra politics  esakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole News : 'अतिशय कमी बुद्धी असलेला प्रदेशाध्यक्ष'; शहाजी बापू पटोलेंवर बरसले!

रोहित कणसे

सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसकडे पद द्यायला माणूस नव्हता म्हणून पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केलं असून पटोले हे राजकारणातील अतिशय कमी बुद्धी असणारे नेते असल्याची जहरी टीका देखील शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.

सांगोला येथे शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणा-या बाबूराव‌ गायकवाड यांच्या अमृतमहोत्सव सत्काराचा कार्यक्रम आज (८ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

शहाजी बापू पाटील म्हणाले की, सध्या अडचण अशी आहे की, आपल्या मानदेशी भाषेत एक म्हण आहे, ज्याला खालचं वरतं कळत नाही त्याला कारभारी केलं. नाना पटोलेला कोळज कुठे, करगडी कुठे, नारळा कुठे, अकलूज कुठे काही माहिती आहे का? उगं आपलं काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद द्यायला कुणी माणूस नाही म्हणून याला केलं. हे काही नाही. राजकारणाची अतिशय कमी बुद्धी असलेले सध्या दुर्दैवाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत.

नाना पटोले काय म्हणाले होते

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (स्व.) माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यामुळे सांगोला तालुका सर्वत्र ओळखला जात होता. सध्या मात्र वेगळ्या कारणांनी सांगोला तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. आम्ही मात्र झाडी, डोंगारवाले गद्दार नाही, तर राज्यातील सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी बांधील असणारे महाविकास आघाडीचे खुद्दार आहोत, असा टोला नाना पटोले यांनी नाव न घेता आमदार शहाजीबापू पाटील यांना लगावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT