Sharad Pawar Shambhuraj Desai esakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर गृहराज्यमंत्री आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

'शरद पवार साहेबांच्या घराजवळ जाऊन ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय, ते अतिशय चुकीचं आहे.'

ST Workers Protest : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'सिल्व्हर ओक' येथील निवासस्थानाबाहेर आज एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) अचानकपणे आंदोलन केलं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी 'सिल्व्हर ओक'च्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केलं. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज आक्रमक झाल्याचं दिसून आलं. आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) या निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचा प्रकार समोर आलाय. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्यानं याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या घरीवरील या हल्ल्याचा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी निषेध नोंदवलाय. माध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले, शरद पवार साहेबांच्या घराजवळ जाऊन ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय, ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही या आंदोलनाचा निषेध करतो, धिक्कार करतो, असा त्यांनी संताप व्यक्त केलाय.

ते पुढे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकारनं सकारात्मक भूमिका घेतलीय. जवळ-जवळ ४१ टक्क्यांपर्यंत पगार वाढ दिलीय. शिवाय, ९० टक्के मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, असं असताना पवार साहेबांच्या घराजवळ जाऊन आंदोलन करणं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) काल आपला निकाल जाहीर केला. याचं एसटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं. हा विषय इथंच संपला असताना आज अचानकपणे जाऊन आंदोलन करणं, हे कितपत योग्य आहे? बेसावध असताना खालच्या थराला जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. मात्र, आम्ही कोणतीही बघ्याची भूमिका घेणार नाहीय. याबाबत पोलिस खात्याला सक्त आदेश दिले असून योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Kills Couple : कोल्हापुरात ऐन दिवाळीत धक्कादायक घटना, बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार

Flower Farming : भारताच्या फूल शेतीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उमटवला मोहोर! एका वर्षात ₹७४९ कोटींचे परकी चलन

Latest Marathi News Live Update : जळगावात रिक्षाचा अपघात, चंद्रकांत पाटलांकडून मदत

Diwali 2025 Dudget Gadget Gifts: नातेवाईकांना द्या बजेट फ्रेंडली 'ही' 4 गॅझेट्स; दिवाळी होईल आनंददायी

IND vs AUS 1st ODI Live: टीम इंडियाला अक्षर पटेल, लोकेश राहुलने दिला आधार; २६ षटकांच्या सामन्यांत ऑसींसमोर 'इतके' लक्ष्य

SCROLL FOR NEXT