shambhuraj desai says that wine sell in general stores is good for farmers esakal
महाराष्ट्र बातम्या

Shambhuraj Desai: "मॉलमध्ये वाईन विक्रीचं धोरण राज्याच्या हिताचं"

महाविकास आघाडी सरकारने 2022 च्या सुरूवातीच्या काळात किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता.

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडीच्या काळात झालेला जनरल स्टोर्स किंवा मॉलमध्ये वाईनविक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे. (shambhuraj desai says that wine sell in general stores is good for farmers )

सत्तासंघर्षानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर अनेक निर्णयात बदल होताना दिसत आहेत. दरम्यान, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी शेतकऱ्यांसंदर्भात मोठं विधान केले. मॉलमध्ये वाईनविक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे असं शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.

तसेच, वाईन विक्रिच्या धोरणाचा ड्राफ्ट घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली. फडणवीस शेतकरी हिताचा निर्णय घेतील. अशा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारने 2022 च्या सुरूवातीच्या काळात किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासंदर्भात हा निर्णय अतिशय महत्त्वाचं असल्याचं सांगत महाविकासआघाडी सरकारने हा प्रस्ताव मांडला होता. मात्र, भाजप व धार्मिक संघटनांनी हा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही असं सांगत विरोध केला होता. सत्ताबदलानंतर आता शंभुराज देसाई यांनी पुन्हा तोच मुद्दा मांडल्याने आता भाजप काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना, मॉलमध्ये वाईन विक्रीचं धोरणासंदर्भात सामान्य लोकांकडून मतं जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. जूलैच्या अखेरीस ही सर्व माहिती आमच्याकडे आली. मात्र, आम्ही मंत्रिमंडळ विस्तारात व्यस्त असल्याने काही दिवस त्याकडे दुर्लक्ष झालं.

मी माझ्या विभागाला शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्या मतांचा एक फॉरमॅट करायला सांगितला आहे. त्याचा अभ्यास करून मग मी यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. माझा अभ्यास पुर्ण झाला की, मी हे सर्व फडणवीस, शिंदेंना विषय समजावेन. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असेल तर, भाजपही विरोध करणार नाही असं मला वाटतंय. असा विश्वास देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT