Sharad Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shambhuraj Desai: "राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही"

आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडीना वेग आला आहे. त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप टीकाही मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. अशातच नुकतेच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते असेच सुरू राहिले तर लोकशाही टिकणार नाही, त्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने पुढे आले पाहिजे असं म्हंटले होते. त्यावरती शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी पलटवार केला आहे.

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी रामराजे यांच्या या विधानावर बोलताना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही असा दावा केलाय. ते पुढे म्हणाले की, जर राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस सत्तेत आली तर लोकशाही टिकली, आणि जर राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस सत्तेतून गेली की लोकशाही धोक्यात आली, पण मला राजे साहेबांना सांगायचं आहे की आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो. आम्ही लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केलं आहे असंही मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हंटलं आहे.

याशिवाय मंत्री शंभूराज देसाई यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्वतः पुरते पाहू नये, आजही सत्तेत येण्यासाठी बहुमताला महत्व आहे. त्यांना खंत याची आहे की त्यांचा पक्ष सत्तेत नाही, सत्तेत नसल्यामुळे लोकशाही धोक्यात किंवा टिकणार नाही असे म्हणून चालत नाही असंही पुढे देसाई यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

SCROLL FOR NEXT