Sharad Kalskar 
महाराष्ट्र बातम्या

एमआयडीसी मध्ये जागा बघितली होती पण... दाभोलकर खुनाप्रकरणी जन्मठेप झालेल्या शरदच्या घरी शोकाकुल वातावरण

Narendra Dabholkar News: या घटनेचे कनेक्शन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील केसापुरी या छोट्याश्या गावात असल्याने परिसरात निकालावर भावनिक प्रतिक्रिया येत आहेत

सकाळ वृत्तसेवा

दौलताबाद- केसापुरी (ता,औरंगाबाद) येथील रहिवासी शरद कळसकर याला दाभोळकर हत्ये प्रकरणी विशेष न्यायालयाने शुक्रवारी (ता.10) दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर शरदच्या घरी शोकाकुल वातावरण असून अक्षय त्रितियाला काहीतरी चांगला निकाल आमच्या बाजूने येऊ शकतो अशी अशा बाळगून असलेल्या परिवाराला या निकालाने धक्का बसला आहे.

माझा भाऊ हा निर्दोष असून न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असून आम्ही निकालाची कॉपी घेतल्यावर उच्य न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शरदचा छोटा भाऊ कृष्ण कळसकर यांनी मोबाईल वरून दिली. शरदचा भाऊ पुणे येथे गेला होता व आई-वडील बाहेरगावी असल्यामुळे शुक्रवारी(ता.10) गावातील घरी परिसरात शांतता होती.

या घटनेचे कनेक्शन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील केसापुरी या छोट्याश्या गावात असल्याने परिसरात निकालावर भावनिक प्रतिक्रिया येत आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने वैभव राऊत व शरद कळसरकर याना मुबंई येथून तर सुदांन्य गोधळेकर याला पुण्यातून, सचिन अंदुरे याला छत्रपती संभाजी नगर येथून अटक केली होती. या घटनेतील एक संशयित शरद कळसकर (अटकेवेळी वय 26) व आता( वय 37 ) रा, केसापुरी ता. जि छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी आहे.

शरद कोल्हापूर येथील मोल्डीग जाँब तयार करणाऱ्या कपंनीत काम करत होता. शरद विषयी त्याच्या बालपणीच्या मित्रांना विचारले असता त्यांनी सांगितले की शरद लहानपणा पासून धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्याचा परिवार स्वाध्याय व वारकरी परिवाराशी जोडलेला असल्याने त्याला स्वाध्याय व हरिपाठ, भजन विषयी आवड होती.

शरद कोल्हापूर येथे जाण्या अगोदर आम्हा मित्रांसोबत असायचा. सर्व मित्र रात्री हरिपाठ भजन आदी धार्मिक कार्यक्रम करायचे व सर्व मिळून समाज मंदिरातच जेवण-झोपणे आदी नित्य कर्म करायचे, त्याला शेती करण्यात आवड होती. अटक होण्याच्या दोन महिन्या पूर्वी सुद्धा तो गावात आला होता. त्यावेळी त्याने शेतात टोमॅटो बांबू लावणे, तार ओढणे आदी काम केले. सुट्टीवर असताना तो दिवसभर कुणाच्याही सोबत न राहता शेती कामावर भर द्यायचा.

कंपनीत असताना तो फोन करून लहान भावाला सुद्धा शेतीच्या विषयी चर्चा करायचा व माझी आवश्यकता असेल तर मी घरी येऊ का असे विचारात असे. परंतु इकडे पाऊस-पाणी व्यवस्थित नसल्याने सध्या काही काम नाही असे त्याच्या भाऊ कृष्णाने त्याला सांगितले होते. सुट्टीत आला असता त्यावेळी त्याने वडिलांना सांगितले होते की आता माझा जीव तिकडे लागत नाही.

मला तुम्ही वाळूज एम आय डी सी मधेच प्लॉट घेऊन द्यावा व लहान कंपनी साठी मदत करावी. परंतु वडिलांनी त्याला सांगितले की तू अजून दोन महिने थांब मी तुला टोमॅटो निघाले की पैसे देतो, या नंतर त्याने माझ्या सोबत एम आय डी सी मध्ये जागा सुद्धा बघितली होती व त्या साठी मी त्याला काही पैसे उसणे देणार होतो असे शरदच्या आते भावाने यावेळी माहिती देताना सांगितले. तो अभ्यासात सर्वसाधरणच होता. त्याला खेळात आवड होती अश्या या विद्यार्थीचे अश्या काही घटनेत नाव यईल असे मला कधी वाटले नाही असे त्याच्या मित्राने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT