sharad pawar ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : ''शिका, नेतृत्व करा आणि बदल घडवा, हे आमचं ब्रीदवाक्य'', शरद पवारांसमोर अजित पवार नेमकं काय बोलले?

संतोष कानडे

पुणेः दौंडमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचा उद्घटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती. काका-पुतणे जाहीर व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या.

या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कुठलंही राजकीय भाष्य केलं नाही. परंतु शरद पवारांच्या कार्याचा उल्लेख करीत त्यांनी संस्थेची प्रगती विषद केली. महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या समोरच त्यांनी कर्मचाऱ्यांना दम देऊन चांगलं काम करण्याच्या सूचना केल्या.

अजित पवार बोलताना म्हणाले की, पवार साहेबांनी शेती क्षेत्रासाठी कृषी विकास प्रतिष्ठान स्थापन केलं आणि शिक्षणाकरिता विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली. पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये या संस्थेचं मोठं जाळं आहे. इंदापूरमध्येही शाळेची शाखा सुरु झाल्याने इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही पवार साहेबांच्या माध्यमातून सुरु केली.

''विद्या प्रतिष्ठान हे एक शैक्षणिक क्षेत्रातलं मोठं नाव आहे. गुणवत्ता जोपासण्यासाठी आणि गरीबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत असतो. आज अनंतराव पवार इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारतीचं १ लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम झालेलं आहे. स्वामी चिंचोली इथं शिक्षणासाठी मोठं संकूल उभारलं गेलं आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा आणखी वाढण्यास मदत होईल.''

अजित पवार पुढे म्हणाले की, शिका, नेतृत्व करा आणि बदल घडवा.. हे या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. दौंडमध्येही विद्या प्रतिष्ठानची शाळा व्हावी, ही साहेबांची इच्छा आहे. परंतु जागा मिळत नसून लवकरच त्यावर तोडगा काढला जाणार आहे.

पवार पुढे बोलले, अनंतराव पवार यांच्या नावाने ही शाळा आहे. त्यांच्या नावाला साजेसं शिक्षण इथं दिलं गेलं पाहिजे.. जर कुणी कमी पडलं तर माझ्याशी गाठ आहे. इथं शिक्षण घेणारा विद्यार्थी लाथ मारीन तिथे पाणी काढेल, असा घडला पाहिजे, असा दम अजित पवारांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना भरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT