Ajit Pawar and Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Live : शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर; अजित पवार काकांच्या जवळ गेले पण...

सकाळ डिजिटल टीम

पुणेः दौंड येथे अनंतराव पवार इंग्रजी शाळेच्या नूतन वास्तू उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती आहे. सुरुवातीला शरद पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले त्यानंतर अजित पवार आले. यावेळी व्यासपीठावर शरद पवार बसलेले असताना अजित पवार त्यांच्या जवळ गेले होते.

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील मौजे चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कुलच्या नूतन वास्तूचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न होत आहे. कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांची मुख्य उपस्थिती आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंबियातील अनेक प्रमुख मंडळी कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत. कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांचीदेखील उपस्थिती आहे.

राजकारण बाजूला ठेवत नणंद भावजय एकत्र आलेल्या दिसून आल्या. शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र फोटोसेशनदेखील केलं. शरद पवार जेव्हा व्यासपीठावर बसलेले होते तेव्हा अजित पवार शरद पवारांच्या जवळ जावून उभे राहिले. मात्र दोघांमध्ये संवाद झाला नाही. कार्यक्रम सुरु असून पुढे काका-पुतणे एकमेकांना बोलतात का, बे बघावं लागेल.

अजित पवारांनी बंड केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केलेली आहे. शरद पवारांनी पक्ष फुटला नसल्याचा सांगत काही लोकांनी वेगळी भूमिका घेतल्याचं वेळोवेळी स्पष्ट केलं. परंतु अजित पवार गटाकडून खरा पक्ष आमचाच असल्याचं सांगितलं जातं. त्यातच आज दोन्ही पवार एकत्र आल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हायव्होलटेज ड्रामा! आधी उमेदवारी अर्ज बाद झाला, आता पित्रा-पुत्रावर गुन्हा दाखल; अमरावतीत शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर कारवाई

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बडे नेते पोलिसांच्या ताब्यात

Sugarcane Protest: अंगावर पाऊस, डोळ्यांत आशा; उसाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांचा 'गोकूळ'विरुद्ध संघर्ष सुरूच, जिल्‍हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ..

June Smartphone Launch : जूनमध्ये लाँच होतायत 'हे' 5 दमदार स्मार्टफोन्स; परवडणारी किंमत अन् जबरदस्त फीचर्स पाहा

Tukaram Mundhe Birthday: तुकाराम मुंढेंचा जन्मदिवस! शेतकरी पुत्र ते आयएएसपर्यंतचा प्रवास; प्रामाणिकपणा आणि शिस्तीची कहाणी

SCROLL FOR NEXT