Sharad Pawar & Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Andheri Byelection: शरद पवारांनी राज ठाकरेंच्या पत्रातील हवा काढून घेतली का?

संतोष कानडे

Rutuja latke News: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने अखेर माघार घेतली आहे. काल राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला अनुसरुन माघार घेण्याची विनंती केली होती. मात्र शरद पवारांनी राज ठाकरेंच्या पत्रातील हवा काढून घेतली का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

स्व. रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लागली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून स्व. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. तर भाजपने मुरजी पटेल यांना मैदानात उतरवलं.

काल रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार देऊ नये, अशी मागणी केली होती. महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक परंपरेला अनुसरुन आणि स्व. रमेश लटके यांचे काम पाहता उमेदवार देऊ नये, असं राज ठाकरे यांनी पत्रामध्ये म्हटले. त्यानंतर भाजपच्या बैठका सुरु झाल्या.

मात्र कालच संध्याकाळी अचानक शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपने उमेदवार मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यासाठी शरद पवारांनी २०१४ सालच्या बीड लोकसभा पोटनिवडणुकीची आठवण करुन दिली. त्यावेळी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपने उमेदवार देऊ नये, उमेदवारी मागे घ्यावी, असं आवाहन पवारांनी केले.

आज खरोखरच भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. शरद पवारांनी सायंकाळी अचानक भूमिका मांडल्याने राज ठाकरे यांच्या पत्रातील हवाच निघून गेल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. पवारांना भाजपच्या भूमिकेचा अंदाज आला होता काय? असाही प्रश्न चर्चिला जोतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare Uddhav Thackeray : सुनिल तटकरेंनी उद्धव ठाकरेंना दिला तगडा झटका! रायगडमधील ठाकरेंचा प्रमुख शिलेदार राष्ट्रवादीत

Tukaram Mundhe: परदेशात एक नियम, भारतात दुसरा का? तुकाराम मुंढेंनी ग्लोबल फूड कंपन्यांना सुनावलं; नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित

Subsidy for Trekking Route Homestays: ट्रेकिंग ट्रॅकवरील गावांमध्ये 'होम-स्टे' उभारण्यासाठी सरकारी अनुदान; जाणून घ्या विशेष योजना

Thane: आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींचा विनयभंग, ५९ वर्षीय कर्मचाऱ्याला अटक, सेवेतून निलंबित; अधीक्षिकेवरही ठपका

Maharashtra Monsoon Prediction : नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT