Sharad Pawar gulabrao patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवार-गुलाबराव पाटलांचा एकत्र प्रवास; पण नेमकी काय चर्चा झाली? वाचा...

संतोष कानडे

जळगावः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज एकत्र प्रवास केला आहे. उभय नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या सगळा अवमेळ सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. विरोधी पक्ष एकमेकांवर टीका करतच आहेत. परंतु सत्तेतील पक्षांमध्येही बेबनाव झाल्याचं दिसून येतंय. शिवाय मंत्रिमंडळ विस्तारामुळे संभाव्य नाराज्या लपून राहिलेल्या नाहीत.

त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोबत प्रवास केल्याचं चित्र महाराष्ट्राने पाहिलं. दोन्ही नेते जळगावच्या दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. दोघांनी एकत्र रेल्वे प्रवास केल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेले आहेत.

उद्या शरद पवार हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. अंमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाचे एकदिवसीय शिबीर होत आहे. या शिबिराला शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. तर गुलाबराव पाटील हेही जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहेत.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे भाजप काही मंत्र्यांना डच्चू देणार आहे. त्यामध्ये गुलाबराव पाटील यांचं नाव घेतलं जात आहे. तसं झालं तर गुलाबराव पाटलांची पुढची दिशा काय असेल? यासंबंधी तर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षेनेते अजित पवार आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते तेथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी फोडाफोडी करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला. फोडाफोडी आणि जिरवाजिरवी कराल तर माझ्याशी गाठ आहे, असा इशाराच अजित पवारांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT