sharad pawar and uddhav thackeray calls sanjay raut after enforcement directorate raid  
महाराष्ट्र बातम्या

ED कारवाईनंतर राऊतांना उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा फोन

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ईडी (ED) यांच्यात वाद सुरु आहे, तर काही दिवसांपुर्वी सक्तवसुली संचलनालयाने काही राऊतांच्या कुटुंबीयांची देखील चौकशी केली होती. यानंतर आता ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने राऊतांच्या आलिबाग आणि दादरमधील मालमत्तांवर छापेमारी केली. यामध्ये अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.

ईडीच्या कारवाईनंतर राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फोन करून माहिती घेतली. या कारवाईनंतर दोघांशीही बोलणं झालं असून काही झालं तरी झुकायचं नाही, अशीच महाविकास आघाडीची भूमिका असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

यावेळी मुख्यमंत्री आणि शरद पवार या दोघांनी ईडीसमोर झुकायचं नाही, तर ईडीचा सामना करायचा असा विश्वास दिल्याचे राऊत यांनी माध्यमांना बोलताना सांगितले. ईडीच्या कारवाईनंतर राऊत यांनी आपण एक पैशाचाही घोटाळा केलेला नाही, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी समाचार घेतला असून, एक पैशाचा घोटाळा नसल्याचा पत्रकारांना सांगून काही फायदा नाही असा चिमटादेखील चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना काढला आहे. तसेच जर काही घोटाळा नसेल तर, त्यांनी न्यायालयात जावे आणि सिद्ध करावे.

तर मागील दोन महिन्यापासून राऊत यांनी ज्या पद्धतीने आरोप केले ही त्यांची मानसिक अवस्था मी समजू शकतो. राऊत यांना वाटत पोलिसांचा माफियासारखा वापर करून तोंड बंद करू पण कितीही दबाव टाका असे म्हणत आम्हाला फरक पडत नाही. कारवाई होणारच असे देखील किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT