Maratha Reservation sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: शरद पवार, उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे मारेकरी, भाजपच्या नेत्यांनी ठणकावले

Maharashtra Bjp: फडणवीस यांना विनाकारण यावरून व्हिलन केले जात आहे’’, मराठा समाज आरक्षणाची लढाई १९८२ पासून लढत आहे

सकाळ वृत्तसेवा

Pune: ‘‘मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत’’, अशा शब्दांत भाजपच्या प्रदेश व केंद्रीय पातळीवरील नेत्यांनी रविवारी या दोन्ही नेत्यांवर खापर फोडले. ‘‘आम्ही सत्तेत आलो, तर आरक्षण मिळते. आम्ही सत्तेतून बाहेर गेल्यानंतर आरक्षण गायब होते, याचा विचार मराठा आंदोलकांनी करावा, असे आवाहन करतानाच, ‘‘चार वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी आरक्षण का दिले नाही’’, अशा प्रश्‍नही नेत्यांनी विरोधकांना विचारला.

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे. प्रदेश अधिवेशनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष अमित शेलार, माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी त्यांचे खापर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच पक्षाची भूमिका आहे’’, असेही यावेळी भाजपच्या नेत्यांनी ठणकावून सांगितले.

बावनकुळे म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले. परंतु आम्ही सत्तेतून गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य बाजू मांडली नाही. त्यामुळे हे आरक्षण टिकले नाही. ठाकरे खरे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत. परंतु फडणवीस यांना विनाकारण यावरून व्हिलन केले जात आहे’’.

मराठा समाज आरक्षणाची लढाई १९८२ पासून लढत आहे. तेव्हापासून २०१४ पर्यंत अपवाद वगळता काँग्रेसचे राज्य होते. चार वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते.

तेव्हा का आरक्षण दिले नाही, असा प्रश्‍न करून फडणवीस म्हणाले, ‘‘आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले, ते न्यायालयातही टिकले. ठाकरे सरकार आले आणि आरक्षण गेले. माझे आंदोलनकर्ते जरांगे यांच्याबद्दल काही म्हणणे नाही, परंतु पवार, ठाकरे आणि पटोले यांना माझा प्रश्‍न आहे. दुटप्पी भूमिका सोडा. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे का नाही, यावर त्यांनी प्रथम आपली भूमिका स्पष्ट करावी. या दोन्ही समाजाला भांडत ठेवायचे आणि शिव्या मात्र आम्ही खायच्या. तुम्ही कितीही शिव्या दिल्या, तरी ती खाण्याची माझी तयारी आहे. परंतु तुमचा बुरखा फाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’, असा इशाराही फडणवीस यांनी या वेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT