Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवलीच ! सुप्रिया सुळे यांच्यासोबत 'या' नेत्याला बनवलं कार्यकारी अध्यक्ष

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा पवारांनी यावेळी केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे जाहीर केली आहेत. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी बोलताना ही घोषणा केली आहे,

आगामी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी या दोघांवर असणार आहे. सध्या तरी अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गोवा आणि गुजरात या राज्यांची जबाबदारी दिली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. तर दोघांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर शरद पवार अध्यक्ष आणि सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष करावेत अशी चर्चाही पक्षात सुरू झाली होती. मात्र, या सर्व चर्चांना शरद पवारांनी आज वर्धापन दिनी पूर्णविराम दिला आहे. आज शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT