Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱयांना कर्जमाफीपर्यंत संघर्षः शरद पवार

सकाळवृत्तसेवा

पनवेल- शेतकऱयांना कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष करणार. सरकारने आमचे ऐकले नाही तर राज्यकर्त्यांचे जगणे हराम करु, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) सरकारवर टीका केली.

शरद पवार यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा समारोप झाला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्जमाफीचा शब्द दिला होता, मात्र हे सरकार शब्द पाळत नाही. उत्तर प्रदेशात शेतक-यांना कर्जमाफी मग महाराष्ट्रात का नाही? दिलेला शब्द पाळायचा नाही ही भाजपाची संस्कृती आहे. फडणवीस सरकारला शेतकरी इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांनो, जीव द्यायचा नाही, आम्ही तुमच्यासाठी आंदोलन करत आहोत. शेतकऱयांना कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष करणार आहोत.

काँग्रेसचे नेते नारायण राणे म्हणाले, 'फडणवीस सरकार हे शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन सत्तेवर आले, परंतु, एकही घोषणा पूर्ण केलेली नाही. शाश्वत विकास केव्हा, कसा करणार हे कुणीही सांगत नाही. एकाही शेतमालाला भाव मिळत नाही. कर्जमाफीच्या घोषणा दिल्या तर आम्हाला निलंबित केले.'

'येत्या तीन दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अन्यथा विशेष अधिवेशन बोलवा, आम्ही यायला तयार आहोत,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samarjitsinh Ghatge BJP : समरजितसिंह घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश, पहिलीच प्रतिक्रिया हसन मुश्रीफांवर; "आमच्यात वैर..."

War Ceasefire Impact: युद्ध थांबलं, आता महागाईवर ब्रेक लागणार? मजबूत रुपयामुळे तुमच्या खिशाला कसा फायदा!

MPSC Success Story: वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून गाठले यशाचे शिखर; विक्रम पाडळेची कर सहाय्यकपदी निवड, अंत्यविधी दिवशीच एमपीएससीची परीक्षा!

कंत्राटदारांच्या बिलांना मंजुरीसाठी ७ टक्के कमिशनची मागणी, लाच घेताना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अटक

डोक्यावर टक्कल,भेदक डोळे ! वाढदिवसाला सुपरस्टार अल्लू अर्जुनची चाहत्यांना खास भेट; ॲटली सोबतच्या बिग बजेट सिनेमाचा पहिला लूक रिलीज

SCROLL FOR NEXT