महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ''प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची मी वाट बघतोय, त्यात त्यांनी...'' शरद पवारांचा पटेलांवर हल्ला

संतोष कानडे

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात बोलताना प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार गटावर पलटवार केला. अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तरं दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

शरद पवारांनी सुरुवातीला राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीबद्दल माहिती देत राज्य सरकारला धारेवर धरलं. भुजबळांना शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधावर बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकांमध्ये सध्या अस्वस्थता आहे. सरकारने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय.

अजित पवार गटाने केलेल्या आरोपांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, आम्हाला जी लोकांनी मतं दिली ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. भाजप आणि त्यांच्यासोबतच्या लोकांसोबत जाणं सुसंगत नव्हतं. त्यामुळे मी त्या निर्णयाच्या बाजूने नव्हतो.

प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दलचा एक प्रश्न पवारांना विचारण्यात आला. ''मी जर पुस्तक लिहिलं तर मालिकाच निघेल, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले'' त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं की, मी त्यांच्या पुस्तकाची वाट बघतोय. लोक पक्ष सोडून का जातात, याच्यावर त्यांनी एखादा चॅप्टर लिहावा.

''त्यांचं घर किती मजल्यांचं आहे आणि ईडी का ताब्यात घेतेय तोही चॅप्टर त्यांनी घ्यावा म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल.'' असं म्हणत पवारांनी पटेलांचा मुद्दा उपस्थित केला. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासंदर्भात करण्यात आलेल्या आरोपांना शरद पवारांनी जशास तसं उत्तर दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT