Sharad Pawar
Sharad Pawar  Esakal
महाराष्ट्र

Sharad Pawar: शहाण्या माणसाबद्दल विचारा म्हणत शरद पवारांनी कोणाबद्दल बोलणं टाळलं?

सकाळ डिजिटल टीम

कसबा पेठेतील नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे.

पत्रकारांनी शरद पवार यांना चद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा शरद पवार चंद्रकांत पाटील यांचं नाव न घेताच शहाण्या माणसाबद्दल विचारा, असं म्हणत शरद पवार म्हणाले. कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी मीडियाशी संवाद साधला.

तर आगामी काळात देखील तिन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. माझा प्रयत्न राहील की विधानसभा आणि लोकसभेसाठी तिन्ही पक्ष एकत्र राहतील असंही पवार पुढे म्हणाले आहेत. त्याचबरोबर लोकांना बदल हवा आहे. लोकांची इच्छा आहे की आम्हीं एकत्रित राहावे असं शरद पवार म्हणाले आहेत.

या पोटनिवडणुकीत महविकास आघाडी म्हणून सगळे काम करत होते. आमचा उमेदवार सगळ्यांना मान्य होता म्हणून तो निवडून आला असंही पवार पुढे म्हणालेत. तर पुढे ते म्हणाले की, कसबा पेठ भाजपचा गड आहे. खासदार गिरीश बापट यांनी तिथं प्रतिनिधित्व केलं. बापटांची गोष्ट वेगळी होती पण त्यांचे सर्वांशी मैत्रीचे संबंध होते. त्यामूळेच हा मतदार संघ जड जाईल असं काही लोकं म्हणत होते पण तिथं बापट आणि टिळकांना डावलून निर्णय घेतले गेले त्याचा फटका भाजपला बसला असंही ते म्हणालेत.

तर रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, हा उमेदवार चार चाकीमध्ये फिरणारा नाही तर हा उमेदवार दुचाकीवर फिरणारा आहे म्हणून दोन पायाची लोकं याला मतदान करतील हे माहिती होतं असंही शरद पवार पुढे म्हणाले आहेत. धंगेकरांना यश मिळेल असं लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण माझ्या मनात शंका होती. परंतू शेवटी शेवटी गिरीश बापट यांच्या सल्ल्याने भाजपमध्ये निर्णय घेतले की नाही अशी शंका होती. त्यामुळेच बापट आणि टिळक हे नाराज असल्याची शक्यता होती. मात्र या उमेदवाराचे काम परिणामकारक ठरले असंही पवार म्हणाले.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, हा उमेदवार कधी चारचाकीत बसत नाही. सतत दुचाकीवर बसून लोकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे दोन पायांवर चालणाऱ्या लोकांनी धंगेकरांना मते दिली. महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी लोंकानी एकत्र यायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT