Sharad Pawar, Narendra Modi And Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: "पंतप्रधानांना सांगितले तरीही..." 'भटकती आत्मा'मुळेच फटका; पवारांवरील टीकेवर काय म्हणाले अजित दादा

Ajit Pawar: पंतप्रधानांची सभा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उठले, तेव्हा दुसऱ्या खुर्चीत बसलेले अजित पवार पटकन मोदींच्या जवळ गेले आणि काहीतरी बोलताना दिसले होते.

आशुतोष मसगौंडे

गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडाली आणि सुमारे 40 आमदारांना बरोबर घेत अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले. इतकेच नव्हे तर अजित पवारांनी पक्षावर दावा सांगत पक्षही मिळवला. यानंतर राज्यातील जनतेत राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. आशात लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख केला होता.

पंतप्रधानांच्या या टीकेनंतर त्यांच्यावर राज्यासह देशभरातून टीका झाली होती. इतकेच नव्हे तर बारामतीसह राज्यातील लोकसभेच्या निकालांवरही पंतप्रधानांच्या टीकेचा प्रभाव पडल्याचे पाहयला मिळाले.

या सर्व घडोमोडी घडल्यानंतर महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवरील पंतप्रधानांच्या भटकती आत्मा या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुण्यातील सभेत शरद पवार यांच्या विरोधात बोलू नये, अशी विनंती अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती, परंतु त्यांनी त्यांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला.

महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत हे वक्तव्य केल्याची माहीत समोर आली आहे.

अजित पवारांनी मोदींना काय सांगितले?

पुण्यात महायुतीच्या पुणे, बारामती, मावळ आणि शिरूरच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती.

पंतप्रधानांची सभा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उठले, तेव्हा दुसऱ्या खुर्चीत बसलेले अजित पवार पटकन मोदींच्या जवळ गेले आणि काहीतरी बोलताना दिसले. या संवादादरम्यान अजित पवारांनी मोदींना सांगितले की, पुणे आणि आसपासच्या चार लोकसभा मतदारसंघात आणि स्थानिक राजकारणात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे त्यांचावर टीका करू नका.

शरद पवारांना काय म्हणाले होते मोदी?

“महाराष्ट्रातील काही भटकत्या आत्म्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेमुळे ४५ वर्षांपूर्वी राजकीय अस्थिरतेचे युग सुरू केले." यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी 1978 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या विरोधात केलेल्या बंडाचा संदर्भ दिला होता.

पंतप्रधान पुुढे म्हणाले होते की, "1995 मध्ये शिवसेना-भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हाही ‘भटकती आत्मा’ सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होती. 2019 मध्ये त्यांनी तत्कालीन सरकारला अस्थिर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. महाराष्ट्रानंतर आता ते देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा ‘भटकत्या आत्म्या’पासून महाराष्ट्राचे रक्षण करण्याची गरज आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT