sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

आमच्या कार्यकर्त्यांची पाठराखण करणे काही गैर नाही; भाजपकडून पवार प्रकरणातील आरोपीची पाठ पाठराखण

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत

सकाळ डिजिटल टीम

अमरावती: उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांना दंगली घडवून आणायच्या आहेत का? याचा शोध घेतला पाहिजे. सध्याचे कार्यक्रम थोडे बंद करण्यास उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी सांगितले पाहिजे, असेही नीतेश राणे यावेळी म्हणाले. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळणे ही दुर्दैवी बाब आहे. मात्र त्यांना धमकी देणारा हा अमरावती शहरातला आमचा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे आता सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी अद्याप कुठलीही चौकशी केली नसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आमच्या कार्यकर्त्यांचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल केले.

दाऊद इब्राहिमला साथ देणाऱ्या नवाब मलिक यांच्याबाबत आपुलकी आणि प्रेम ते लोक बाळगू शकतात, मग आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची पाठराखण करणे काही गैर नाही, असेही राणे यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आदित्य ठाकरे शिवाय दुसरा कोणी देऊ शकत नाही. ठाकरेंच्या घरी नोकरी करणारे राऊत हे आदित्य ठाकरे यांना नको आहेत, असे देखील त्यांनी सांगितले. कोल्हापूर दंगलीच्या मास्टरमाइंडला शोधून त्यांना तातडीने अटक करावी.

शिवाजी महाराजांच्या राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण यापुढे सहन केले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारे हे महाराष्ट्र राज्य आहे. या महाराष्ट्र राज्यात औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचणाऱ्यांना धडाच शिकवला पाहिजे, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांना आलेल्या धमकीच्या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्यांना निश्चितच शिक्षा होईल. हे सरकार उद्धव ठाकरेंचे नाही, आता आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी दक्ष आहेत, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT