महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांचा भाजपला दे धक्का, बड्या नेत्यांचा पक्षात प्रवेश

NCP Sharad Pawar: सोनगाव, सात्रळ, धानोरे पंचक्रोशीत विजेची समस्या व रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले.

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Politics: सोनगाव (ता. राहुरी) येथील भाजपच्या पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी तुतारी हाती घेऊन भाजपला रामराम ठोकला. त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिला.

राहुरी येथे आज (शुक्रवारी) आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा झाला. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस व सोनगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण अंत्रे, तालुका सरचिटणीस प्रशांत अंत्रे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र अनाप, ओबीसी आघाडीचे तालुका संघटक महेश पर्वत, ओबीसी आघाडी कार्यकारिणी सदस्य संतोष अंत्रे, सामाजिक कार्यकर्ते सूरज शिंदे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

आमदार तनपुरे म्हणाले, सोनगाव, सात्रळ, धानोरे पंचक्रोशीत विजेची समस्या व रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले. कामे घेऊन आलेले पदाधिकारी कोणत्या पक्षाचे आहेत. याचा विचार न करता जनतेची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे सोनगाव येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये सन्मानाची वागणूक मिळेल, असेही तनपुरे यांनी सांगितले.

किरण अंत्रे म्हणाले, सोनगाव येथील भाजपच्या गटातटाच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विरोधक असताना आमदार तनपुरे यांना सांगितलेली विकास कामे त्यांनी मार्गी लावली. त्यांच्या कामावर प्रभावित झाल्याने राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला. आगामी विधानसभेला राष्ट्रवादीला मताधिक्य देण्यास कटिबद्ध आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. यावेळी मिलिंद अनाप, अण्णासाहेब अनाप, सूर्यभान शिंदे, दिग्विजय शिरसाठ, नरेंद्र अनाप, राहुरीचे माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब उंडे, नंदकुमार तनपुरे, प्रकाश भुजाडी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरणात मोठी कारवाई! पोलिसांनी पाच आरोपींना दौंडमधून घेतलं ताब्यात

Pune Bopdev Ghat Accident Breaking : पुण्यातील बोपदेव घाटात भीषण अपघात! भरधाव आयशर टेम्पो बस स्टॉपवरील विद्यार्थ्यांच्या घोळक्यात शिरला; २ जणांचा मृत्यू तर ३ गंभीर

MSRTC NCMC Card: एसटीच्या स्मार्ट कार्डचा रिचार्ज आता फक्त ५ रुपयांपासून; ५० रुपयांची अटही हटवली!

Chhatrapati Shivaji Maharaj Forts Dress Code : शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर आता 'ड्रेसकोड'? छोटे कपडे घालण्यास बंदी घालण्याचा अखिल भारतीय मराठा महासंघाचा नागपुरात मोठा ठराव!

Latest Marathi News Live Update: मुंबई राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यावर अखेर पडदा; माजी कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT