Sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी पुन्हा मारली पलटी, अदानी प्रकरणात भाषा झाली मवाळ!

रुपेश नामदास

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या सहा दशकांपासून भारतीय राजकारणात सक्रीय असून लोकशाहीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांचे मत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यातच राहुल गांधी हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी करत आहेत. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केले होते.

हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी अनावश्यक असल्याचं पवार यांनी म्हटलं. जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीत सत्ताधारी पक्षाचे बहुमत राहिलं. त्यामुळे सत्य बाहेर येऊ शकत नाही, अस मत पवार यांनी व्यक्त केल होतं.

मात्र त्यांनी पुन्हा आपली भूमिका बदलली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार म्हणाले, अदानी मुद्द्यावरून आमच्या मित्र पक्षांची मतं वेगळी आहेत, मात्र आम्हाला विरोधी पक्षात एकोपा ठेवायचा आहे. अदानी मुद्द्यावर मी माझं मत मांडलं. मात्र, आमच्या सहकाऱ्यांना वाटत असेल तर, JPC च्या चौकशीचा मी विरोध करणार नाही. विरोधकांच्या एकीवर दुष्परिणाम होवू नये म्हणून आम्ही आग्रह धरणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

अदानी प्रकरणावर शरद पवार काय म्हणाले होते?

विरोधकांनी हिंडनबर्ग अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले. या फर्मची पार्श्वभूमी कुणालाच माहित नाही, आम्ही त्यांचे नावही ऐकले नाही. या प्रकरणात एका औद्योगिक समूहाला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच हिंडेनबर्ग ही परदेशी कंपनी आहे या कंपनी बद्दल मी कधीही ऐकलेले नाही.

हिंडनबर्ग अहवालापेक्षा आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल हा आमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे. ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. याचा विरोधकांच्या एकजुटीवर कोणताही परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,100 अंकांनी वाढला, निफ्टी 23,900 पार; सेन्सेक्स-निफ्टीत अचानक वाढ का?

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : पुण्यात आजपासून पाणी कपात

SCROLL FOR NEXT