Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

औरंगाबादच्या नामांतरावरुन 'मविआ'त मतभेद? शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

औऱंगाबाद - एकनाथ शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. परंतु, सरकारच्या भवितव्यावर अनिश्चिततेचं सावट असताना महाविकास आघाडी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. त्यापैकी औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय महत्त्वपूर्ण होता. अखेरच्या कॅबिनेटच्या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय मविआ सरकारने घेतला होता. आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्दावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ते औरंगाबाद येथे बोलत होते. (Sharad Pawar Marathi Letest news)

औऱंगाबादच्या नामांतराच्या मुद्दावर पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात नामांतराचा मुद्दा नव्हता. तसेच नामांतराच्या मुद्दावर सुसंवाद झाला नव्हता असंही असं पवार यांनी स्पष्ट केलं. या विधानामुळे शरद पवारा यांनी नामांतराच्या मुद्दातून राष्ट्रवादी काँग्रेसला बाजुला केलं का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

यावेळी शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल मोठं विधान केलं आहे. शिवसेनला झालेली मोठी हानी आणि सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार असे प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, पुढील काळात येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा आहे. मात्र हे निर्णय बसून चर्चेतून घ्यावे लागतील, असंही त्यांनी नमूद केलं.

यावेळी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. सत्ता गेल्याने अस्वस्थता निर्माण झाली होती. आता अस्वस्थता कमी झाले असेल, अशी टीका शरद पवार यांनी नाव न घेता फडणवीसांवर केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेमकी कोणाची याचा निर्णय उद्या न्यायालयात लागेल, असं म्हणत आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: हार्दिक पांड्याचे सलाम-ए-इश्क! दोन षटकार.. शेवटच्या चेंडूवर फिफ्टी.. माहिका शर्माला फ्लाइंग Kisssss Video Viral

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

SCROLL FOR NEXT