NCP Chief Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : भाजपसोबत जाण्याच्या अजित पवार गटाच्या विनंतीवर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - महाराष्ट्रात शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर वर्षभराने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. या फुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवारांची मनधरणी कऱण्याचा प्रयत्न होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना विनंती केली. यावेळी शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचं सांगण्यात येत आहे.

वायबी सेंटर येथे आज अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत पुन्हा एकदा शरद पवार यांनी पक्षात फूट पडू देऊ नये, अशी विनंती केली. याआधी रविवारी म्हणजेच काल देखील अजित पवार गटाने पवारांना हीच विनंती केली होती.

दरम्यान शरद पवार हे आपली भूमिका बदलण्यास तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे. भूमिका बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असं पवारांनी ठणकावून सांगितल्याचं समजतं. त्यामुळे आज देखील अजित पवार गटाला रिकाम्या हाती परतावे लागले आहे.

शरद पवार यांचं राजकारण अनेक वर्षांपासून पुरोगामी विचारांच्या भवती फिरत आहे. मात्र अजित पवार हे भाजपसोबत गेले आहेत. अर्थात अजित पवार गटाकडून सातत्याने आम्ही विचार बदलला नसल्याचं सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला शरद पवार आज जावू शकले नाहीत. मात्र शरद पवार उद्या बंगळुरू येथे जाणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT