Sharad Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : आता महाराष्ट्रातही जातीय जनगणनेच्या मागणीचं लोन; शरद पवारांनी केली मागणी

रवींद्र देशमुख

मुंबई - देशात विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला आहे. तर बिहारमध्ये आधीच सर्वोच्च न्यायालयाने जातनिहाय जनगणनेला होकार दिला आहे. त्यातच आता महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणनेचा मुद्दा समोर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. पवार यांनी आज जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांची भेट घेतली. या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला होता.

शरद पवार मराठा आरक्षणाच्या मुद्दावर बोलताना म्हणाले की, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढविण्याची गरज आहे. तेव्हाच मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्याचवेळी देशात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी त्यांनी केली.

शरद पवार यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेताना झालेल्या लाठीचार्जवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT