Sharad pawar demans cast base census to modi govt for obc reservation  
महाराष्ट्र बातम्या

जातीनिहाय जनगणना करा, शरद पवारांचे मोदी सरकारला आवाहन

सकाळ डिजिटल टीम

राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. यादरम्यान आज राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट मोदी सरकारला जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्या असे अवाहन केलं आहे. (Sharad pawar demans cast base census to modi govt for obc reservation)

राज्यघटनेने एससी, एसटी सुविधा दिल्या अधिकार दिले समाजात हा मोठा वर्ग ओबीसी आहे. त्यांना आधार द्यायची गरज आहे. तो सन्मानाने उभा राहत नाही तो पर्यंत गरज आहे, समाजाच्या उपेक्षा टाळण्यासाठी आरक्षण दिलं पाहीले असे पवार म्हणाले.

केंद्राने ओबीसी जनगणना करावी म्हणजे त्यानुसार न्याय वाटणी व्हावी, कोणी इथे फुकट मागत नाही. जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही, ज्याच्या हातात देशाची सूत्र आहेत ते करतील असे वाटत नाही, आपल्याला एकत्र याव लगेल असे शरद पवार म्हणाले. रस्त्यावर आल्याशिवाय गत्यंतर नाही, ज्यांच्या हातात राज्य त्यांची मानसिकता वेगळी असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

सत्य समोर आल तर चुकीचं वातावरण होईल? वस्तुस्थिती समोर आली तर अस्वस्थता येईल?कोर्टाने जे माहिती मागितली त्याबद्दल डेटा गोळा करायचे काम सुरू आहे. आज भाजप नेते सांगतात, माजी मुख्यमंत्री सांगतात धोका दिला, पाच वर्ष सत्ता असताना, देशात सरकार असताना तुम्ही झोपला होता का? असा सवाल देखील शरद पवार यांनी भाजपला विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT