Ajit Pawar NCP Crisis Chhagan Bhujbal reminded Sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : ''एक-दोन वेळा ठिकय, तुम्ही नेहमी भाजपशी चर्चा करता अन् माघार घेता...'' भुजबळांचा पवारांवर हल्ला

संतोष कानडे

मुंबईः अजित पवार गटाने जराही भीडभाड न ठेवता थेट शरद पवारांवर हल्ला चढवणं सुरु ठेवलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांना हात घातला.

छगन भुजबळ म्हणाले की, सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी सगळ्या कायदेशीर बाबी तपासल्या आहेत. पूर्ण अभ्यास करुनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारच असलीत. आम्ही आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत, असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं. शरद पवारांपासून वेगळं होतांना आम्ही शेवटची चर्चाही केली. परंतु मार्ग निघाला नाही. त्यामुळे आम्ही पुढे गेल्याचं भुजबळांनी सांगितलं.

शरद पवारांच्या वयाच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी त्यांना निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावर छगन भुजबळांना त्यांच्या वयाबद्दल विचारलं. त्यावर ते म्हणाले की, माझं वाय वाढलं आहे म्हणूनच मी प्रांताध्यक्ष पद स्वीकारलेलं नाही. राज्यभर फिरायचं असतं म्हणून पद स्वीकारलं नाही. सभा, इतर कार्यक्रमांना मी उपस्थित राहणार आहे. अजित पवारांनी सांगितलं तुम्ही थांबा तर मी थांबेल.

शरद पवार आणि भाजपशी बोलणी, या मुद्द्यावर बोलतांना छगन भुजबळ म्हणाले, एक-दोन वेळा ठिकय पण शरद पवारांनी अनेकदा भाजपशी बोलणी केली. चार-पाच वेळा त्यांनी भाजपसोबत जाण्यासंबंधी बोलणी केली आणि पुन्हा माघार घेतली. चर्चा करता परत मागे येता, एकदा ठिक आहे परंतु नेहमी नेहमी का असं करता? भाजपशी चर्चा करुन सातत्याने शब्द फिरवल्याचं भुजबळांनी थेट सांगितलं.

जो नेता काल माझ्याबद्दल बोलला तो नेता भाजपसोबत जाणार होता, हे खातं द्या.. ते खातं द्या म्हणत होता; असा घणाघात छगन भुजबळांनी केला.

दरम्यान, काल अजित पवार यांनीही २०१४, २०१७, २०१९ मध्ये कशा पद्धतीने भाजपसोबत जाण्यासंबंधी चर्चा झाल्या, याचा पाढाच वाचला. याबाबत शरद पवार यांच्याकडून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही. पवार या टीकेला कसं उत्तर देतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT