Sharad Pawar Raju Shetty esakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांबरोबर मतभेद, मात्र ते जातीयवादी नाहीत : राजू शेट्टी

हेमंत पवार

'एवढ्या दिर्घ काळात शरद पवारांनी कधीही जातीयवादी भूमिका घेतलेली नाही.'

कऱ्हाड (सातारा) : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना गेल्या अनेक वर्षांपासून मी ओळखतो. आमचे-त्यांचे वैचारिक मतभेत आहेत. मात्र, ते जातीवादी नाहीत, असं स्पष्ट मत खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आज कऱ्हाड (जि. सातारा) इथं व्यक्त केलं.

बळीराजा उध्दार यात्रेनिमित्त राजू शेट्टी शनिवारी कऱ्हाडला (जि. सातारा) आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वाभिमानीचे सचिव राजेंद्र गड्डेनवार, जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, रामचंद्र साळुंखे आदी उपस्थित होते. शेट्टी पुढे म्हणाले, 'ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगाव देवराष्ट्रे पासून बळीराजा उध्दार यात्रा सुरु झाली आहे. एक मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत शेतीला दिवसा १० तास वीज मिळावी, शेतकऱ्यांना हमीभावाचा गॅरंटी कायदा केंद्र सरकारनं (Central Government) मंजूर करावा हे दोन ठराव करण्यात येणार आहेत. ते ठराव घेवून उच्च न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत. राजकाणापलीकडं जावून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचा हा प्रयत्न आहे.'

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गेल्या अनेक वर्षांपासून मी ओळखतो. त्यांचं राजकारणही बघतो. भले त्यांचे-आमचे वैचारिक मतभेत आहेत. मात्र, एवढ्या दिर्घ काळात त्यांनी कधीही जातीयवादी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळं मी स्पष्टपणे सांगतो की, ते जातीवादी नाहीत. मात्र, शेतकऱ्यांऐवजी ते शेती मालावर प्रक्रिया करणारी जी लॉबी आहे, त्यांना डोळ्यासमोर ठेवून धोरण घेतात. त्यामुळं त्यांचे आणि आमचे वैचारिक मतभेद आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT